तिलारी घाटातील तो संरक्षक कठडा धोकादायक
तिलारी दोडामार्ग महामार्ग हा सुस्थितीत झाल्याने या मार्गावर रहदारीचे प्रमाण वाढले आहे.या मार्गावरुन गोवा येथुन पर्यटक तेलगंणा,आंध्रप्रदेश या ठिकाणी तिलारी घाट मार्गावरुन येजा करतात.परंतु तिलारी घाट रस्ता हा जरी सुरळीत झाला असला तरी रस्त्याच्या आजुबाजुला असलेली झाडी त्यामुळे रस्ता अरुंद बनला आहे.
तिलारी घाट रस्ता हा वेडीवाकडी वळणे तसाच तीव्र चढ उताराचा देखील आहे.पर्यटकांना या रस्त्यांचा अंदाज येत नसल्याने काही दिवसांत अनेक अपघात देखील घडले आहेत.या रस्त्याच्याकडेने झाडी देखील खुप वाढली आहे.तसेच बांधकाम केलेले संरक्षक कठडे देखील तुटले आहेत त्यामुळे तीव्र उतारावरुन नियंञण सुटल्याने अनेक अपघात घडले आहेत.तर रस्त्यावर झाडी आल्याने रस्ता देखील अरुंद बनला आहे.त्यामुळे अनेक नवीन वाहनचालकांना वळणावर अंदाज येत नसल्याने हा रस्ता अपघातांना आमंञण देत आहे.त्यामुळे या रस्त्यांची डागडुजी करावी व संरक्षक कठडे देखील सुस्थितीत करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व वाहनचालकांकडुन होत आहे.

Comments
Post a Comment