हिरकणी नारीशक्तीतर्फे बांद्यात महिलांना मार्गदर्शन
'जिच्या हाती उद्योगाची दोरी ,ती साऱ्या जगाला उद्धारी' हे ध्येय समोर ठेवून भारतातील प्रत्येक महिला आत्मनिर्भर ,स्वयंपूर्ण व्हावी, स्त्री शक्तीचा समाजकार्यासाठी आणि सामाजिक विकास कामांसाठी उपयोग व्हावा, हे ध्येय उराशी बाळगून हिरकणी नारीशक्ती ब्रिगेड ही संस्था खास महिलांसाठी कार्यरत आहे. महिला पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व दाखवत आहेत. खेडय़ातील महिलांना योग्य संधी आणि योग्य मार्गदर्शन दिले , वेळोवेळी मदतीचा हात दिला तर प्रत्येक महिला आत्मनिर्भर स्वयंपूर्ण होईल .त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. हिरकणी नारीशक्ती ब्रिगेड ही संस्था महिलांच्या समस्या, गरजा समजून घेऊन त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी, त्यांना व्यावसायिक मार्गदर्शन करण्यासाठी, सामाजिक कार्याला प्रेरित करण्यासाठी काम करत आहे .त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हिरकणीचे सदस्य व्हा व तुमचा स्वतःचा उद्योग सुरू करा ,असे विचार हिरकणी नारी शक्ती ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ. हिराताई पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. बांदा येथे घेण्यात आलेल्या हिरकणी नारीशक्तीच्या सभेत त्या बोलत होत्या .
रविवार दिनांक 16 एप्रिल रोजी बांदा येथील विठ्ठल रखुमाई सभागृहात हिरकणी शक्ती ब्रिगेडचा मार्गदर्शनपर कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षपदी हिरकणी नारीशक्ती ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ. हिराताई पवार ,प्रमुख अतिथी हिरकणी समूहाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री.जे. डी. सर तसेच महाराष्ट्राच्या कोषाध्यक्ष सौ.अस्मिता भालेराव, महाराष्ट्र महासचिव सौ. परवीन पानसरे, महाराष्ट्र कार्याध्यक्ष सौ.संध्या जगताप, महाराष्ट्र महा संघटक सौ. आशा फडतरे, महाराष्ट्र सचिव सौ. हेमलता खेडेकर, महाराष्ट्र सचिव श्रीमती योगिता थेऊरकर, कोकण अध्यक्ष सौ.मानसी परब, कोकण कार्याध्यक्ष सौ. अर्चना पांगम ,कोकण सचिव सौ.संजना सावंत ,सिंधुदुर्ग अध्यक्ष श्रीमती सविता मेस्त्री ,सिंधुदुर्ग उपाध्यक्ष सौ. निकिता साटेलकर, सिंधुदुर्ग कार्याध्यक्ष सौ. उर्मिला ऊरुमकर, सेल्फ हेल्प ग्रुपच्या गोवाच्या सेक्रेटरी तसेच मराठी साहित्य मंडळाच्या अध्यक्षा सौ. मेघा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
हिरकणी नारीशक्ती ब्रिगेडच्या सर्व सदस्यांनी हिरकणी सोबतच्या आपल्या जीवनप्रवासाचे ,त्यांच्या यशस्वीतेचे अनुभव कथन केले. श्रीमती योगिता थेऊरकर या महिलेचा पिंपरीच्या सरपंच पदी पोहोचेपर्यंतचा खडतर प्रवास रोमांचकारी आणि प्रेरणादायी ठरला. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून बांदा पंचक्रोशीतील महिलांसाठी खास पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पाककलेसाठी रताळे व अंडी यांपासून पदार्थ बनवणे असा विषय देण्यात आला होता .स्पर्धेचा निकाल पुढे पुढील प्रमाणे .
शाकाहारी पदार्थ
प्रथम- सौ.आस्था मयेकर
द्वितीय- साक्षी वाळके
तृतीय -साक्षी आमडोसकर
उत्तेजनार्थ प्रिया महाजन व अमृता महाजन
अंड्यापासून पदार्थ बनवणे
प्रथम -सौ. दिपाली बांदेकर
द्वितीय - सौ.साक्षी आमडोसकर
तृतीय -सौ. निकिता मोरेस्कर आणि उत्तेजनार्थ संगीता म्हाडगूत ,
कु.संजना पांगम
स्पर्धेचे परीक्षण गोवा येथील म्युनिसिपालिटी शेफ टीचर, ब्युटीशियन सौ मेघा संदीप जाधव यांनी केले .यावेळी महिलांसाठी खास लकी ड्रॉ खेळाचे आयोजन करण्यात आले होते .सौ शितल तारी या लकी ड्रॉ च्या मानकरी ठरल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रीना मोरजकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी बांदा येथील हिरकणी नारी ब्रिगेडचे सदस्य सौ.रीमा हरमलकर ,सौ.स्नेहल हरमलकर, सौ.राखी कळंगुटकर, इरम खान, रेश्मा आदर, संगीता म्हाडगूत, सौ.दिपा मालवणकर,सौ. शितल तारी,सौ.दर्शना केसरकर ,सौ पालवी शिरसाट आदी महिला उपस्थित होत्या.

Comments
Post a Comment