सेवा शक्ती संघर्ष कामगार संघ , या युनियनला भाजपाचा पुर्ण पाठींबा-राजन तेली

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते वेंगुर्ले आगारात " सेवा शक्ती संघर्ष कामगार संघाच्या " नामफलकाचे उद्घाटन

 वेंगुर्ले आगार येथे  माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष श्री राजन तेली तसेच जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना(बाळू) देसाई यांच्या हस्ते नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले. 


      यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष राजन तेली म्हणाले की आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखालील ही एस्. टी. कर्मचारी संघटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आगारामध्ये स्थापन करण्यासाठी सहकार्य केले जाईल . तसेच राज्यात शिंदे - फडणवीस सरकार असल्याने एस्. टी. कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्या संघटनेने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. तसेच महीलांना एस्.टी.प्रवासात ५० % सवलत दिल्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नांत वाढ झाल्यामुळे तोट्यात असलेले महामंडळाची आर्थिक परिस्थिती सुधारत असून, लवकरच सिंधुदुर्गातील आगारामध्ये नविन गाड्या येणार असल्याचे सांगीतले. तसेच यासाठी पालकमंत्री नाम.रविंद्र चव्हाण पाठपुरावा करत असल्याचे सांगीतले.

       या वेळी सिंधुदुर्ग विभागाचे नेतृत्व करणारे  रोशन तेंडोलकर, वेंगुर्ला आगाराचे भरत चव्हाण, सावंतवाडी आगाराचे प्रशांत माडकर, वेंगुर्ला आगार सचिव- दाजी तळवनेकर, उपाध्यक्ष- सखाराम सावळ, कार्याध्यक्ष- आशिष वराडकर, मिलिंद मयेकर, महादेव भगत,  मनोहर वालावलकर, संजय झोरे, विनायक दाभोलकर, तेजस जोशी, सचिन सावंत, आशिष धावडे, P.D.मोहिते, सुहास गवंडळकर, प्रदेश का.का.सदस्य शरद चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष नाथा नाडकर्णी, साईप्रसाद नाईक, सारीका काळसेकर, शितल आंगचेकर, पुनम जाधव, वसंत तांडेल, बाबली वायंगणकर, चंदु मळीक, पिंटू सावंत, भुषण सारंग, शेखर काणेकर, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर, नितीश कुडतरकर, अंकीता देसाई, गवस इत्यादी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे