संत सोहिरोबनाथ आत्मसाक्षात्कार दिन ५ मे रोजी

 इन्सुली डोबाशेळ येथील श्री संत सोहिरोबानाथ मंदिर येथे श्री संत सोहिरोबनाथ आत्मसाक्षात्कार दिनानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन शुक्रवार दिनांक ५ मे


रोजी करण्यात आले आहे. यानिमित्ताने सकाळी ६ वाजता काकड आरती, सकाळी ८.३० वाजता श्रीच्या पादुकावर अभिषेक, सकाळी ९.३० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी ५.३० वाजता श्री संत सोहिरोबनाथ भजन मंडळ बांदा यांचे भजन, सायंकाळी ७ ते ८.३० पालखी सोहळा, रात्री ठीक ९.३० वाजता ओंकार पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ वेंगुर्ले यांचा कुंकु झाले वैरी हा नाट्यप्रयोग होणार आहे. या कार्यक्रमाचे लाभ घेण्याचे आवाहन श्री संत सोहिरोबानाथ सेवा समिती व उत्कर्ष युवक कला क्रीडा व व्यायाम मंडळ इन्सुली यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे