ॲड.सुभाष तथा आबासाहेब पणदुरकर यांना पुरस्कार प्रदान
श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी व कै.ॲड.दिपक नेवगी कुटुंबिय यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा कै.ॲड.दिपक नेवगी स्मृती पहिला पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जेष्ठ विधिज्ञ ॲड.सुभाष तथा आबासाहेब पणदुरकर यांना प्रदान करण्यात आला.
ॲड.सुभाष पणदूरकर यांच्या विविध क्षेत्रातील बहुमूल्य कार्याची दखल घेऊन प्रा. दत्ता पाटील, गडहिंग्लज यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, शाल -श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.या वेळी व्यासपीठावर प्रा. प्रवीण बांदेकर, बीसीएमजी उपाध्यक्ष ॲड. संग्राम देसाई, जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक, सौ. रेखा नार्वेकर, कार्याध्यक्ष श्री. रमेश बोन्द्रे, ॲड. संदीप निंबाळकर उपस्थित होते.

Comments
Post a Comment