आरोंदा तेरेखोल खाडीत आंतरराष्ट्रीय पर्यटन उभारणार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

 आरोंदा तेरेखोल खाडी परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन उभे केले जाणार आहे. त्यासाठी गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांना आमंत्रित करण्यात येईल, असे सांगतानाच तेरेखोल खाडीपात्रात होणारी अवैद्य वाळू उपसा रोखण्यासाठी कारवाई करा, अशी सूचना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज दिली.


शालेय शिक्षणमंत्री श्री. केसरकर यांनी आरोंदा येथे वाळू उत्खननामुळे होणाऱ्या नुकसानीची, मॅंग्रोव्हज बोडवॉक प्रकल्पाच्या जागेची, पर्यटनदृष्ट्या हाऊस बोट व तेरेखोल नदीच्या किनाऱ्यावर निवास व न्याहरी व्यवस्था आणि प्रस्तावित मरीना प्रकल्पाची पाहणी केली.  यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्यासह सातार्डा, किनळे, रेड्डी, आरोंदा व कवठनी सरपंच उपस्थित होते.    शालेय शिक्षणमंत्री श्री. केसरकर यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या बोटीतून सविस्तर पाहणी केली. यावेळी बैठक घेऊन उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आरोंदा तेरेखोल खाडीत आयआयटी मुंबईने तयार केलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या हाऊसबोट या ठिकाणी आणल्या जातील. असे सांगून श्री. केसरकर म्हणाले, प्रत्येक बोटीत रुम्स च्या संख्या वाढवा अतिशय चांगल्या पध्दतीने चालू शकतील. ही खाडी आंतरराष्ट्रीय आकर्षणाची केंद्र ठरेल इतकी गुंतवणूक या ठिकाणी आणली जाईल. ज्या ज्या लोकांच्या जमिनी आहेत त्यांना छोटी छोटी हॉटेल्स तयार करुन दिले जातील. फ्रान्स, स्कॉटलंड च्या धर्तीवर या ठिकाणी न्याहरी निवासी केंद्र उभारली जातील. यामधून असंख्य लोकांना रोजगार मिळेल त्यामुळे जिल्ह्याचा विकास होईल. 

तेरेखोल खाडीपात्रात बेकायदेशीर होणारा वाळू उपसा रोखण्यासाठी कारवाई करा. अशी सूचना देवून श्री. केसरकर म्हणाले, बेकायदेशीर वाळू उपसामुळे जमिनीची धूप होते. त्यामुळे शेतकरी अडचणीत येतात. त्यासाठी   होड्या जप्त करा, त्यांच्यावर कारवाई करा, पर्यटनाचे संवर्धन करा. 


Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे