मसुरे मध्ये १८ एप्रिल रोजी प्रथमच महिला पुरुष यांच्या मध्ये २०-२० भजन डबलबारी..
बुवा श्रीकांत शिरसाट आणि रीया मेस्त्री..
श्री साई मंदिर मसुरे च्या वर्धापन दिनानिमित्त १८ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता २०-२० आमने सामने मालवण तालुक्यात प्रथमच महिला पुरुष २०-२० भजन डबलबारी सामना श्री साई मंदिर मसुरे रविवार बाजारपेठ येथे
आयोजित केला आहे. हा सामना
बुवा श्री श्रीकांत शिरसाट
ओम चैतन्य गगनगिरी प्रसादिक भजन मंडळ मुंबई.
तालुका वैभववाडी.
गुरुवर्य कै.चंद्रकांत बुवा कदम यांचे शिष्य.
पखवाज - अमोल पांचाळ, तबला - महेश तळेकर.
विरुद्ध
बुवा.. रिया मेस्त्री
श्री स्वामी समर्थ नवतरूणी भजन मंडळ
लोरे न.1 नरामवाडी, कणकवली...
गुरूवर्य... बुवा राजेश मेस्त्री.
पखवाज... मिलिंद लाड.
तबला...भावेश लाड. यांच्या मध्ये होणार आहे.
१९ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता साई भंडारा होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आव्हान श्री साई कृपा मित्र मंडळ मसुरे बाजारपेठ यांनी केले आहे.

Comments
Post a Comment