गोगटे वाळके महाविद्यालयाचे दोन विद्यार्थी नीट परीक्षेत उत्तीर्ण

 बांदा,ता.२५: येथील गोगटे वाळके कॉलेज बांदाच्या एम. ए. मराठी विभागाचे विनय वाडकर, लक्ष्मण तळवणेकर, हे दोन विद्यार्थी विद्यापीठ अनुदान आयोग दिल्ली यांच्यावतीने डिसेंबर २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षेत (NET)उत्तीर्ण झाले आहेत. त्या निमित्ताने त्यांचा महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. बांदा महाविद्यालयात गेली बारा वर्षे मराठी हा विषय पदव्युत्तर पातळीवर शिकवला जातो.


याआधी २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत महाविद्यालयाच्या दर्शना शिरोडकर ही नेट परीक्षा उत्तीर्ण झाली होती. या आधीही ही परीक्षा उत्तीर्ण होऊन विध्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात व्यवसायाच्या संधी प्राप्त केल्या आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनां महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. जी. काजरेकर, प्रा. हर्षवर्धिनी जाधव, प्रा. एन. डी. कार्वेकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डी. बी. वारंग, सचिव एस. आर. सावंत व प्राचार्य काजरेकर आणि शिक्षक शिक्षकशिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे