भोसले स्कूलमध्ये 'लर्न अँड ग्रो' उत्साहात...रंगांच्या दुनियेत मुले झाली दंग...

सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयोजित  'लर्न अँड ग्रो' ही स्पर्धा आज मोठ्या उत्साहात पार पडली. फिंगरप्रिंट कलरिंग व क्ले मॉडेलिंग अशा दोन गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेला मुलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचे उदघाटन माजगाव येथील कलाशिक्षक सिद्धेश कानसे, शाळेच्या प्रशासकीय अधिकारी  सुनेत्रा फाटक व प्राचार्य वेंकटेश बक्षी यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने करण्यात आले.


     _स्पर्धेच्या सुरुवातीला भोसले स्कूलचे कलाशिक्षक गजानन पोपकर यांनी मुलांना फिंगरप्रिंट कलरिंग व फिश मॉडेलिंग या दोन्हीही कलांचे प्रात्यक्षिक करून दाखवले. रंगसंगती प्रभावी होण्यासाठी बोटांचा वापर कसा करावा तसेच मातीची प्रतिकृती बनवताना काय खबरदारी घ्यावी याचे मार्गदर्शन केले._

     _बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून फ्लाईंग टॉट्स प्री-स्कूलच्या  संचालिका सपना पिंगे व संस्थेच्या अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंतभोसले उपस्थित होत्या. पाच ते सात वयोगटातील फिंगरप्रिंट  कलरिंग स्पर्धेत दक्ष राऊळ याने प्रथम, मीरा देसाई हिने द्वितीय व प्रणिती कालेलकर हिने तृतीय क्रमांक पटकावला. अयान डिसोझा व ऋग्वेद सावंत यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला._

     _आठ ते दहा वयोगटातील क्ले मॉडेलिंग स्पर्धेमध्ये श्रेया मेस्त्री हिने प्रथम, आर्या सावंत हिने द्वितीय तर प्राची सावंत हिने तृतीय क्रमांक मिळवला. प्रथम पोखरे व सानवी टिळवे यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू व प्रमाणपत्र देण्यात आले. सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले._

     _स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रियांका डिसोजा व प्राची कुडतरकर यांनी केले. आभार प्रदर्शन श्वेता खानोलकर व नेहा महाडेश्वर यांनी केले._

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे