केर गावाने घेतला स्वच्छ नदीसाठी पुढाकार ▪️अर्थ डे साजरा केला आगळा -वेगळा
दोडामार्ग - शासनाने अर्थ दिवस (earth) साजरा करण्याच्या सूचना स्थानीक स्वराज्य संस्थाना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने दोडामार्ग तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केर -भेकुर्ली ग्रामपंचायतीने उल्लेखनीय पाऊल उचलले असून पाणी स्रोत बळकट करणे आणि नदी स्वच्छ उपक्रम राबवला आहे. या उपक्रमाचे तालुकास्तरातून कौतुक होत आहे.
शासनाने अर्थ दिवस साजरा करण्याचा मानस व्यक्त केला होता. यामध्ये पंचमहाभूतांपैकी भूमी, जल, वायू, अग्नी, आकाश या घटकापैकी एका घटकावर काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तालुक्यात आपल्या विशेष उपक्रमासाठी प्रसिद्ध असणाऱ्या केर - भेकुर्ली ग्रामपंचायतीने अर्थ डे ( earth day ) आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. आज नदी गाळाने भरल्या आहेत या अनेक गावातील समस्या आहेत त्यामुळे पाणी साठा शिल्लक राहत नाही. शिवाय नदीचे नदीपणही हिरावले आहे. त्यामुळे केर येथील मुख्य नदीचा प्रवाह साफ करण्यात आला त्याचबरोबर पाणीसाठा राहण्यासाठी कोंड करण्यात आली. त्यामुळे नदी स्वच्छ झालीच शिवाय पाणी साठवण जागा केल्याने भविष्यात पाणी साठा वाढण्यास मदत होणार आहे. यासाठी ग्रामपंचायत, स्थानिक ग्रामस्थ, बांधकाम विभाग, महसूल विभाग यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे ग्रामपंचायतकडून सांगण्यात आले

Comments
Post a Comment