अखेर सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्राला एमबीबीएस डॉक्टर
सावंतवाडी,ता. १८: सांगेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अखेर एम.बी.बी.एस डॉक्टर उपलब्ध झाले आहेत. गेले तीन महिने रिक्त असलेल्या जागेवर डॉ. ओंकार कुबडे यांची नियुक्ती करण्यात आली. यासाठी सांगेली सरपंच लवू भिंगारे यांनी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या माध्यमातून पालकमंत्री रवींद्र चव्हाणांकडे पाठपुरावा केला होता. दरम्यान डॉ. कुबडे यांनी आपला पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे ग्रामपंचायत प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रातील एमबीबीएस डॉक्टरची जागा गेले तीन महिने रिक्त होती. त्यामुळे गावातील तसेच पंचक्रोशीतील रुग्णांची गैरसोय होत होती. त्यामुळे श्री. भिंगारे यांनी या प्रश्नाकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार त्यांनी तात्काळ दखल घेऊन त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध करून दिले. त्यामुळे भिंगारे यांनी ग्रामस्थांच्या वतीने श्री. चव्हाण व श्री. तेली यांचे आभार मानले आहेत.

Comments
Post a Comment