सिंधुदुर्गचा खासदार भाजपचाच होण्यासाठी प्रयत्न करा:रवींद्र चव्हाण
सावंतवाडी शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकारच्या योजना पोहचल्या पाहिजेत . नेत्यांना फौलो करीत त्यांच्या भूमिका जनसामान्यांपर्यंत पोहोचवा . २०२४ ला होणाऱ्या लोकसभेत ४०० पार करायचेत . सिंधुदुर्गात भाजपच खासदार निवडून आणायचाय , त्यासाठी कामाला लागा . २४४७ कमळ लावून पक्षाची भूमिका पोहोचवावी , असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले . विधानसभा मतदारसंघातील भाजपचा महाविजय अभियान २०२४ चा ' समारोप मेळावा सावंतवाडीच्या गांधी चौकात सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला . यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते .
सावंतवाडी विधानसभेच्या माध्यमातून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा विशेष सन्मान करण्यात आला . दोडामार्गम धील सरपंच व कार्यकर्त्यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला . याप्रसंगी महाराष्ट्रील पहिल्या कोलगाव ग्रामपंचायतच्या मोबाईल अॅपचे लोकार्पण करण्यात आले . यावेळी सावंतवाडीचे माजी नगराध्य संजू परब यांनी मनोगत व्यक्त करताना नेत्यांचे आभार मानले . न.प.च्या नळपाणी योजनेचे काम पालकमंत्री स्वीद्र चव्हाण यांनी केले . यासाठी ४७ कोटी मंजूर करत रस्त्यासाठी ३ कोटी व इतर कामांसाठी एकूण ७ कोटींचा निधी शहरविकासाला दिला . केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातूनही शहराला कोट्यवधीचा निधी मिळाला असे मत माजी नगराध्यक्ष संजू परख यांनी व्यक्त करत नेत्यांचे आभार मानले . तर जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर म्हणाले , गेल्या ५ वर्षातील पालकमं त्र्यांना जमले नाही ते रवींद्र चव्हाणांनी ८ महिन्यांत करून दाखवले . सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधीचा निधी दिला . आज प्रत्यक्षात काम देखील सुरु आहेत . केंद्रात मोदींचे व राज्यात हिंदि फडणवीस यांच डबल इंजीन सरकार आहे . त्यामुळे संजू परब यांच्या वचननाम्यातील कोरोनात राहिलेल्या सर्व गोष्टी ७ महिन्यांत पूर्ण होणार असा विश्वास जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी व्यक्त केला . दरम्यान , भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आपल्या भाषणातून स्थानिक आमदार शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला . ते म्हणाले , २ ते १२ एप्रिल असे अभियान झाले . यात जनतेचा उदंड प्रतिसाद मिळाला . राज्य व केंद्र सरकारचे काम तळागाळापर्यंत आम्ही पोहोचवले नारायण राणे मुख्यमंत्री असताना मोठा निधी जिल्ह्याला आला . त्यानंतर रवींद्र चव्हाण पालकमंत्री असताना भरघोस निधी मिळाला . मधल्या पालकमंत्र्यांनी काम केली नाही , असा टोला शिक्षणमंत्री दीपक केसरकर , उद्योगमंत्री उदय सामंत यांचे नाव न घेता भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेलींनी हाणला . मागच्या पालकमंत्र्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना निधी दिला नाही . आपण मात्र सर्वांना निधी देतायत . पण काहीजणांचे कार्यकर्ते आपणच निधी आणल्याच्या आविर्भावात भूमिपूजने करत नारळ फोडतायत . चोरीला गेलेल्या विकासकामांचा शोध घेणे सुरू आहे . चष्मा कारखाना कुठे गेला ? याचा शोध घेण्यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी लागेल . खोटं बोलायचं पण किती ? यालाही मर्यादा आहेत असा टोला केसरकर यांचे नाव न घेता लगावला . तर २०१४ ला फक्त बांधात भाजप होते . आज ६३ पैकी ५२ ग्रामपंचायतीत भाजपची सता आहे . मतदारसंघात १२५ पैकी ८२ ग्रामपंचायतींवर सत्ता आहे . सावंतवाडी वेंगुर्ला , दोडामार्ग नगरपरिषदेत भाजपचा झेडा असून शतप्रतिशत भाजप करताना आम्हाला पाठिंबा द्या , युती करायचीच असेल तर निवडणुकीनंतर करा , असे मत व्यक्त केले . एक ग्रामपंचायत असताना विधानसभा लढवली . आज पक्ष बळकट आहे . जगातला मोठा पक्ष भाजप असून या पक्षाचा सदस्य असल्याचा अभिमान आहे . लोकांची अपेक्षा एकच आहे ती म्हणजे दोन हातांना काम मिळावे . केंद्रीय मंत्री नारायण राणे व सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांच्या माध्यमातून हा विकास होईल . मोठ्या प्रमाणात उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत . सावंतवाडी शहराला ऐतिहासिक वारसा आहे . इयला विकास होणे पण आवश्यक होते . मात्र , इथल्या लोकप्रति निधीनी स्वतःची जागा जावू नये म्हणून महामार्ग बाहेरून नेला . येथील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे . १५ वर्षे देवदे वस्कीमुळे हैराण असल्याने कुणी बोलणार नाही . पालकमंत्री म्हणून तुम्हालाच पुढाकार घ्यावा लागेल . मल्टीस्पेशालि टीचे भिजत घोंगडे कबुलायतदार प्रश्न मित्रपक्ष असला तरी कणखर भूमिका घेत सोडवावा लागेल , असे मत व्यक्त करत मतदारसंघासह शहरासाठी वेगळे पॅकेज द्यावे अशी मागणी राजन तेली यांनी पालकमंत्री चव्हाण यांच्याकडे केली . भाजप प्रदेश सचिव निलेश राणे म्हणाले , राजन तेली खूप फास्ट आहेत . आज ते काय खावून आलेत ठावूक नाही . आज ते राणेसारखे बोलले . एकदम रोखठोक काहीच शिल्लक ठेवले नाही . पण , राजन तेली बोलले ते खरंय . नारायण राणे पालकमंत्री असेपर्यंत मंत्रालयात रोग लावावी लागत नव्हती . मधल्या आठ वर्षात तो रूबाब गमावला . निधी पाठवा असे सांगायची गरज तेव्हा पडली नाही . मागची अडीच वर्षे तर आपण कोमट पाणीच पित होतो . ठाकरेच्या सरकार मध्ये जिल्हा नियोजनचा निधी कमी झाला . पण , रवींद्र चव्हाण पालकमंत्री झाल्यापासून माझ्यात ' डबल इंजीन आले . नारायण राणेंनंतर रवींद्र चव्हाण यांच्या रूपाने मंत्रीमंडळात तो स्वाब दिसायला लागला असे मत व्यक्त केले . तर राजन तेलींनी सावंतवाडी साठी मागीतलं , पण आम्हाला विसरू नका अशी मिश्किल टिप्पणी करीत कुडाळ - मालवण कणकवलीवरही लक्ष ठेवा असे विधान केले . तेली उमेदवारी जाहीर करतील असे वाटले होते . सावंतवाडीत काहीच कळत नाही . संजू परब यांचा एक डोळा आमदारकीवर तर एक न.प.वर आहे . त्यामुळे डोळ्यांच्या डॉक्टरला दाखवावे लागेल . परंतु आपण फक्त काम करत राहायचं , आमदारकी ज्याच्या नशिबात आहे त्याला मिळेल . माझ्यासह स्टेजवरच्या सगळ्यांच्या इच्छा देव पाटेकर पूर्ण करो , अशी जोरदार फटकेबाजी राणेनी केली .
दरम्यान , पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी महाविजय अभियान २०२४ चा समारोपात कार्यकर्त्यांना संबोधित केले . यावेळी ते म्हणाले , एक संकल्प करण्यासाठी आपण जमलोत . नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर संसदेच्या पायरीवर नतमस्तक झाले . पंतप्रधान झालो तरी देशाचा जनसेवक म्हणून काम करेन ही नरेंद्र मोदी यांची भूमिका ते आजपर्यंत निभावत आहेत . शेवटच्या व्यक्तिपर्यंत ही भूमिका पोहचवत आहे . १४ वा वित्त आयोगाचे पैसे थेट ग्रामपंचायतीला जावू लागले . कुणावर टीका करण्यासाठी मी उभा नाही . सबका साथ सबकाविकास ही मोदींची संकल्पना आहे . देश सुजलाम सुफलाम होण्यासाठी त्यांचा भर आहे . ७५ वर्षांपूर्वीचे बजेट आज दुप्पटीपेक्षा जास्त झालंय . देश वेगळ्या दिशेने प्रवास करतोय . शेतकरी , महिलांचा सन्मान करण्यासाठी राबविलेल्या योजनातून आत्मसन्मान देण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले . भाजप हा देशातील बलाढ्य पक्ष आहे . त्याग आणि समर्पणातून तयार झालेली ही पार्टी आहे . फळाची अपेक्षा न करता पक्षाचे काम करणारे असंख्य कार्यकर्ते भाजपात आहे . देशात व राज्यात नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू आहे . पारदर्शकता काय असते हे कोलगाव ग्रामपंचायतीने दाखवले . त्यांचे करायचे तेवढे कौतुक थोडे आहे . येणाऱ्या काळात डिजीटल माध्यमातून जाणे आवश्यक आहे . भाजपच कमळ २४ तास लावून फिरावे व डबल इंजीनच्या सरकारचे काम तळागाळापर्यंत पोहोचवावे . सरकारने घेतलेला निर्णय , त्याचा अभिनंदनाचा ठराव घेण्यात आपण कमी पडतोय . शिंदे - फडणवीस सरकारने केलेल्या कामाचे क्रेडिट सुद्धा आपण घेतले पाहिजे . परिस्थिती बदलायची पण मानसिकता कोण बदलणार कामचुकार अधिकाऱ्यांना जागा कोण दाखवणार ? हे काम आपणालाच करावे लागेल . शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकारच्या योजना पोहचल्या पाहिजेत . नेत्यांना फॉलो करत त्यांच्या भूमिका जनसामान्यांपर्यंत पोहचवा . २०२४ ला होणाऱ्या लोकसभेत ४०० पार करायचेत . सिंधुदुर्गात भाजपचा खासदार निवडून आणायचाय , त्यासाठी कामाला लागावे . २४x७ कमळ लावून पक्षाची भूमिका पोहोचवावी . देश महासत्तेकडे जातोय . अनेक विकासकाम देशात व राज्यात होतायत , मविआ काळातील लोडशेडींग सुद्धा आता गायब झाले आहे . हे सहज शक्य नाही . नरेंद्र मोदी यांची साथ अन् शिंदे - फडणवीस यांचा ध्यास यामुळेच हे शक्य आहे . आगामी काळात आमचे नेते नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली हा मतदारसंघ जिंकायचाय असे प्रतिपादन रवींद्र चव्हाण यांनी केले . यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण भाजप प्रदेश सचिव निलेश राणे भाजप राजन तेली जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी , उपाध्यक्ष अतुल काळसेकर , युवराज लखमराजे भोसले , संघटन मंत्री शैलेश दळवी , युवा मोर्चा जिल्हा घ्यक्ष भाई सावंत , अशोक सावंत , रगजीत देसाई , राजन गिर प्रमोद कामत , प्रभाकर सावंत , महेश सारंग , संजू परव संध्या तेरसे , प्रज्ञा ढवण , मोहिनी मडगावकर , बाळू देसाई , चंद्रकांत जाधव , मनोज नाईक आदीसह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

Comments
Post a Comment