जंगल सफरच्या धर्तीवर आंबोलीतील धबधब्यांना नवा लूक

 सावंतवाडी,ता.३०: वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोलीतील दुर्लक्षित असलेले सहा धबधबे आता नैसर्गिक पायवाटेने जोडण्यात येणार आहेत. त्यासाठी “जंगल सफर”च्या धर्तीवर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या धबधब्यांना नवीन लूक देण्यात येणार आहे. ही योजना रत्न सिंधू योजनेतून साकारण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली. दरम्यान आंबोली येथे असलेले फुलपाखरू उद्यान विकसित करण्यात येणार आहे. तसेच या धबधब्यावरून थेट पर्यटक चालतील यासाठी संस्थान असलेल्या पायवाटा खुल्या करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. आंबोलीतील धबधब्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. सद्यस्थितीत सुरू असलेल्या व पायवाटा असलेल्या एका धबधब्यावर तीन लाखाहून अधिक पर्यटक भेट देतात. परंतु अन्या धबधब्यावर पर्यटक जाऊ शकत नाही. या पार्श्वभूमीवर दुर्लक्षित असलेल्या धबधब्यांचा विकास व्हावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या धबधब्याच्या विकास करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आज शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांनी या धबधब्यांची घाटात जाऊन पाहणी केली.


यावेळी उप वनसंरक्षक एस नवकिशोर रेड्डी, वनक्षेत्रपाल आंबोली विद्या घोडके, वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, सृजन असोसिएट्स सिव्हिल कन्सल्टंट राहुल नवले, जयेश देसाई, सुशील दिक्षीत, सागर पालकर मॉन्टेरींग तज्ञ, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष नितीन मांजरेकर, राजन रेडकर, योगेश तेली, दिनेश गावडे, विशाल बांदेकर आदी उपस्थित होते. आंबोली घाटातील धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. तेथे सहा धबधबे कोसळत असतात त्या धबधब्यावर पायी चालत जाण्यासाठी एकच पाय वाट अर्थात नॅचरल वाॅक ट्रेलने जोडण्यासाठी रत्नसिंधु योजनेतून मंजूरी देण्यात आली आहे. आंबोलीच्या पर्यटनासाठी विविधता निर्माण करण्यात येत आहे. फुलपाखरू उद्यान देखील पर्यटकांची वर्दळ वाढविणारे ठरणार आहे असे शिक्षण मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे