श्री बांदेश्वर मंदिर कलशारोहण वर्धापनदिन उत्साहात

 बांदा,ता.१७: येथील जागृत स्वयंभू श्री देव बांदेश्वर मंदिर कलशारोहणचा सातवा वर्धापन दिन सोहळा सोमवारी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. हजारो भाविकांनी या सोहळ्याला उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.  या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


सकाळी श्री गणपती पूजन, देवतास नारळ, विडे अर्पण करून समुदायीक गाऱ्हाणे करुन कार्यक्रम आरंभ झाला. सकाळी ब्रम्हवृंदाच्या मंत्रोच्चारात श्री देव बांदेश्वर मंदिरात रुद्राभिषेक अनुष्ठान, श्री देवी भूमिका मंदिरात श्री सूक्त आवृत्ती अनुष्ठान, श्री गणेश मंदिरात गणपती अथर्वशीर्ष आवृत्ती जप अनुष्ठान करण्यात आले.दुपारी महाआरती व शिवनामाचा जयघोष करुन सर्वांच्या कल्याणासाठी गाऱ्हाणे घालण्यात आले.त्यानंतर महाप्रसाद आरंभ झाला. सायंकाळी स्थानिक मंडळाची भजने त्यानंतर कीर्तन तसेच रात्री  पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे