ज्यांना काम म्हणजे काय माहित नाही तेच टीका करतात:ना.केसरकर
आतापर्यंत आपण जी विकास कामे मार्गी लावली आहे ती जनतेने बघितली आहे ,यामध्ये दोडामार्ग तालुक्यातील हॉस्पिटल ईमारत, असो की नूतन पंचायत समितीची ईमारत, आय टी आय बिल्डिग असो तालुका क्रिडागंण आदी कामे होत आहे तालुक्यांतील प्रमुख रस्ते यामध्ये चौले ते मागेली रस्ता, मोर्ले ते पारगड, तेरवण ते पारगड, आदी होत आहे तसेच अनेक रस्ते होत आहे त्यामुळे ज्यांना काही माहिती नाहीं,काम म्हणजेच काय असत! तेच टीका करतात ,अशी टिप्पणी शिक्षणमंत्री दिपक केसरकर आज तिलारी येथे आज हेलिकॉ्पटरमधून भेट दिली असता कोणाचे नाव न घेता केली.
ना.दिपक केसरकर म्हणाले की, दोडामार्ग सावंतवाडी विधानसभा जनेतेने भरभरून प्रेम दिले आहे मी कोणाच्या टीकेसाठी मतदार संघांत येत नसून येथील जनतेला विकास हवा आहे त्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी प्रयत्नशिल आहे यामध्ये आडाळी येथे नव्याने १५० एकरात आर. एन. ग्रूप मोठी गुंतवणूक करणार आहे त्यामुळे येथील स्थानिकांना युवकांना रोजगार मिळणार आहे यासाठी आज संबधीत यंत्रणेने पाहणी केली आहे तसेच तीलारीत पर्यटन विकास करण्यात येणार आहे तिलारी प्रकल्पाच्या आतील भागात हत्ती साठी सुरक्षित जागा प्रस्तावित आहे त्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत तसेच यावेळी हत्ती कडून होणारे फळ बगायातीचे वाढीव दराने नुकसान भरपाई मिळावी याबाबत प्रयत्नशिल असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं या भागातील लोकांच्या महत्वाचां हत्ती प्रश्न भेडसावत आहे त्यासाठी आपण वनमंत्री याचेशीबैठक घेउन चर्चा केली असल्याचं त्यांनी सांगून लवकरच कार्यवाही होणार असल्याचं सांगितलं यावेळी शिवसेना तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस उपजिल्हा प्रमुख राजेद्र निंबाळकर जिल्हा संघटक गोपाळ गवस , बाबाजी देसाई रामदास मेस्त्री, संदिप गवस, विनायक शेट्ये, भगवान गवस कोनाळ संरपच सौ.गवस उपसरपंच रत्नकात कर्पे, पांडूरग लोंढे, मायकल लोबो, आदी उपस्थित होते यावेळी तहसीलदार अरूण खानोलकर कार्यकारी अभिंयता रोहित कोरे, आदींनी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांचे हेलिपॅडवर स्वागत केले यावेळी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली होती माञ नवीन मोपा विमानतळ झाल्यानें हवाई सिग्नल मिळत नसल्याने त्यांनी आडाळी एम् आय डी सी ला भेट दिली नाही ते पुढे आंबोली येथे जायला निघाले. मात्र आडाळी न गेल्याने कार्यकत्यानी नाराजी व्यक्त केली

Comments
Post a Comment