भोसले पॉलीटेक्निकचे राज्यस्तरीय टेक्निकल पेपर प्रेझेंटेशन मध्ये सुयश..

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्यावतीने ठाणे येथील थीम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय टेक्निकल पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेत यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.


     _कॉलेजच्या मेकॅनिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या 'डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ मोबाईल ऑपरेटेड इलेक्ट्रिक वायर कटिंग मशीन' या सादरीकरणाला द्वितीय क्रमांकाचे रु.10,000/- रोख पारितोषिक मिळाले. मेकॅनिकलचे विद्यार्थी यश परब, कैफ कुरेशी, तनिष सावंत, पार्थिव तळवणेकर, पुरुषोत्तम वंजारी व राज कळसुलकर यांनी प्रा.पुष्कर परब यांच्या मार्गदर्शनाखाली हे सुयश प्राप्त केले._

     _विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, प्राचार्य गजानन भोसले व विभाग प्रमुख अभिषेक राणे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या._

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे