"ती" जागा मान्य नसल्यास आठवडा बाजार स्वार हॉस्पिटल समोरील जागेत...
दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण; माजी नगराध्यक्षांच्या भूमिकेला विरोध नाही, परंतु तलावाचे विद्रूपीकरण नको...
सावंतवाडी ता. १५:आपण सूचविलेल्या जागेत आठवडा बाजार नेल्यास आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, अन्यथा हॉकर्स संघटनेच्या मागणीनुसार स्वार हॉस्पिटलच्या समोरील जागेचा पर्याय खूला आहे. मात्र काही झाले तरी मोती तलावाच्या काठावरचा बाजार हलविण्यात येणार आहे, असा पुनरूच्चार शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे केला दरम्यान माजी नगराध्यक्ष माझे अगदी जवळचे आहेत. त्यांनी ज्या ठीकाणी बाजार बसविला त्याला माझा विरोध नाही, किंवा मी हे श्रेयासाठी करीत नाही. तलावाचे विद्रुपीकरण होवू नये कींवा त्या ठीकाणी जेष्ठांना बसायला आणि चालायला मिळावे, यासाठी बाजार हलविणे गरजेचे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
श्री. केसरकर यांनी आज राजवाड्यात भेट दिली. यावेळी त्यांनी राणीसाहेब शुभदादेवी भोसले यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांना आठवडा बाजाराबाबत विचारले असता त्यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले सदयस्थितीत ज्या ठीकाणी आठवडा बाजार आहे, त्या ठीकाणी तलावाचे विद्रुपीकरण होत आहे. त्यामुळे त्या ठीकाणचा बाजार हलवून अन्य ठीकाणी नेण्यासाठी दोन पर्याय दिले आहेत. त्यात शहरातील पर्यायी आपण चार जागा सुचविल्या होत्या. त्यात रघुनाथ मार्केट आणि परिसरातील जागा चितारआळी,शांती निकेतन स्कुल ते मच्छीमार्केट आणि वसंत प्लाझा येथिल नाल्यावरील जागेचा समावेश होता. त्या ठीकाणी बाजार नेल्यानंतर त्या ठीकाणी कोणतीही समस्या जाणवणार नव्हती. तसेच त्या ठीकाणी आवश्यक असलेल्या सुविधा पालिकेकडुन उपलब्ध करूुन दिल्या असत्या. परंतू हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष अॅड संदिप निंबाळकर यांनी आपली भेट घेवून ती जागा मान्य नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता त्यांना आम्ही स्वार हॉस्पिटलच्या समोरील जागा सुचविली आहे. त्या ठीकाणच्या जागेबाबत त्यांनी विचार करावा केवळ विरोधासाठी विरोध करणे योग्य नाही. त्यामुळे याबाबत सकारात्मक भूमिका घेवून योग्य तो निर्णय घेण्यात यावा. त्या ठीकाणी सुध्दा आवश्यक असलेल्या सुविधा आम्ही उपलब्ध करून देणार आहोत, असे केसरकर म्हणाले.

Comments
Post a Comment