बदलत्या काळानुसार स्वतःमध्ये अपेक्षित बदल घडवून आणून शिक्षक व शिक्षण संस्थांनी समाजाभिमुख व्हावे.
बांदा नवभारतच्या पुरस्कार वितरणा वेळी श्री बी. एन. तेली सर यांचे प्रतिपादन.
बांदा:शिक्षक दिनानिमित्ताने जाहीर झालेल्या धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई या शिक्षण संस्थेचा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक २६ मार्च रोजी बांद्यातील खेमराज प्रशालेच्या व्यासपीठावर संपन्न झाला. आदर्श काम करणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक, लिपिक, सेवक आणि शाळा यांचा संस्थेकडून दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात येते व शिक्षक दिन साजरा होतो. यावेळी गुरुवर्य व्ही. एन. नाबर आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार संस्थेच्या भेडशी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री नंदकुमार नाईक, आदर्श शिक्षक पुरस्कार श्री सुहास वराडकर सर (मडूरा हायस्कूल), आदर्श लिपिक पुरस्कार श्री भिवा जाधव (बांदा हायस्कूल) आदर्श सेवक पुरस्कार श्री संजय बांदेकर (परेल हायस्कूल) आणि आदर्श शाळा पुरस्कार शिवछत्रपती मध्यामिक विद्यालय असनिये हायस्कूल यांना देण्यात आले याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष श्री मिलिंद तोरसकर, संस्था सचिव श्रीम कल्पनाताई तोरसकर, समन्वय समिती सचिव सौ रश्मी तोरसकर, सहसचिव श्री नंदकुमार नाईक सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सोबतच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक श्री बी. एन. तेली सर , श्री अन्वर खान, मेजर देसाई व्यासपीठावर उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री तेली सर यांनी शिक्षकाने स्वतःला अपडेट ठेवले पाहिजे तर आजच्या विद्यार्थ्यांचे समाधान तुम्ही करू शकाल. शिक्षक व शिक्षण संस्थांनी समाजाभिमुख होऊन आधुनिक भौतिक सुविधा उपलब्ध केल्या पाहिजेत असे प्रतिपादन त्यांनी केले. तर विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करत असताना संस्था कायम तुमच्या पाठीशी आहे असे आश्वासन धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्री मिलिंद तोरसकर यांनी केले. आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त असनीये हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री कैलास जाधव यांनी मी संस्थेचा सेवक ही भावना मनात ठेऊन विद्यार्थी व शाळेच्या हितासाठी उत्साहाने सतत कार्यरत राहण्याचा मंत्र उपस्थितांना दिला. या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थीत राहिलेल्या मेजर देसाई यांनीही आपले अनुभव आणि भावना या प्रसंगी व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ रश्मी नाईक व श्री रणसिंग यांनी तर आभाप्रदर्शन बांदा हायस्कूलचे जेष्ठ शिक्षक श्री नंदकिशोर नाईक यांनी केले.

Comments
Post a Comment