शिव संस्कारचा सन्मान सोहळा २ एप्रिलला गोव्यातील साखळी येथे होणार विजेत्यांचा सन्मान
सावंतवाडी : येथील 'शिवसंस्कार' संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध ऐतिहासिक स्पर्धाचा 'भव्य पारितोषिक वितरण सोहळा' २ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ५:०० वा गोव्यातील रवींद्र भवन, साखळी येथे संपन्न होणार आहे, अशी माहिती शिवसंस्कारच्या अध्यक्ष डॉ. सोनल लेले यांनी सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रा. रुपेश पाटील, भरत गावडे आदी उपस्थित होते.
डॉ. लेले पुढे म्हणाल्या की २ एप्रिलला संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सांस्कृतिक मंत्री,गोविंद गावडे, महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, चंद्रकांत शेटये (आमदार, डिचोली उपस्थित राहणार आहेत.
यावेळी संस्थेतर्फे विशेष सन्मानाचे मानकरी पांडुरंगजी बलकवडे (ज्येष्ठ इतिहास संशोधक, पुणे), अॅड. वल्लभ गांवस देसाई (इतिहास अभ्यासक, गोवा), प्रभाकर ढगे (संपादक, गोवाईन न्यूज चॅनेल, साहीत्यिक व इतिहास अभ्यासक ) सौ. प्रज्ञा मातोंडकर (माध्यमिक हायस्कूल, मळगाव), अतुल मुळीक (कुडणे, गोवा), गोविंद साखळकरे (ऐतिहासीक नाणी प्रदर्शन, डिचोली), अवधूत बिचकरे (शिवसंस्कार डिजीटल प्रसारक, करोड) तसेच
विषेश सत्कारमूर्ती नारायण मानकर (मुख्याध्यापक, कळसुलकर हायस्कूल, सावंतवाडी), अनिल ठाकरे (शिक्षक, कळसुलकर हायस्कूल, सावंतवाडी)
हे उपस्थित राहणार आहेत.
या सन्मान सोहळ्यानंतर रात्री ८:०० वा. अखिल नाटयसृष्टीत वन्समोअर मिळवून इतिहास घडवणारा नाट्यप्रयोग 'इथे ओशाळला मृत्यू' लेखक - वसंत कानेटकर, दिग्दर्शन - गणेश ठाकूर, सादरकर्ते - शिवगणेश प्रोडक्शन्स (मुंबई) सादर होईल.
तसेच गोविंद साखळकर संग्रहित ऐतिहासीक नाणी प्रदर्शन देखील होणार असल्याचे डॉ. लेले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
तसेच या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन तमाम शिवप्रेमी, इतिहास संशोधक व अभ्यासक यांना टीम शिवसंस्कारने केले आहे.

Comments
Post a Comment