हडपीड स्वामी समर्थ मठ येथील साडेतीन शक्तीपीठ दर्शन सोहळ्यास प्रारंभ
स्वामी प्रकटदिन सोहळा उत्साहात संपन्न
देवगड तालुक्यातील हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे गुरुवारी स्वामी समर्थ प्रकट दिन तसेच स्वामी समर्थ मठाच्या चौथ्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून स्वामी मठाचे संस्थापक सचिव अक्कलकोटभूषण श्री नंदकुमार तु. पेडणेकर यांच्या संकल्पनेतून स्वामी मठात महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठातील सत्वयुक्त देवीची दोन दिवस स्थापना मोठ्या उत्साहात व भक्तीपूर्ण वातावरणात गुरुवारी झाली. तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चांदीच्या नूतन चरण पादुकांची प्रतिष्ठापना प.पु. जगतगुरु शंकराचार्य करवीर पीठ, कोल्हापूर यांच्या शुभहस्ते झाली.
गुरुवारी पहाटे
गणेश पूजन, पादुका पूजन, श्री सत्यनारायण महापूजा,
सकाळी ९ वाजता
प.प. जगतगुरु शंकराचार्य करवीर पीठ, कोल्हापूर यांच्या शुभहस्ते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चांदीच्या नूतन चरण पादुकांची प्रतिष्ठापना तसेच साडेतीन शक्तिपीठांच्या सात्विक महादेवींची दोन दिवसीय स्थापना. लघुरुद्र,पालखी सोहळा,
दुपारी महाआरती, महाप्रसाद, श्री प्रशांत पाटीदेकर यांचा सुस्वर गीतांचा कार्यक्रम, सायंकाळी
देवींचा आविष्कार
सखी परिवार (कोकण कट्टा), रात्रौ
महाराष्ट्राची लोकधारा इंद्रायणी ग्रुप- सावंतवाडी.आदी कार्यक्रम झाले.पालखी सोहळ्यास महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. कोकणकट्टा च्या स्वामी सेवकांची मोठी मदत यावेळी आयोजकांना झाली. मुंबई येथील उद्योजक लाडू सम्राट कमलाकर राक्षे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
शुक्रवार २४ मार्च २०२३ रोजी सकाळी ८.०० वा. देवींची पूजा, सकाळी १०.०० वा. कुंकुमार्चन, दुपारी १२.०० वा. महाआरती, दुपारी ९.०० वा. महाप्रसाद, दुपारी ३.०० वा. प्रा. डॉ. यशवंतराव पाटील (सर) नाशिक यांचे व्याख्यान, सायं. ५ वा. नामस्मरण, सायं ६ वा. गोंधळ आणि इतर भक्तीचे कार्यक्रम होणार आहेत.
हा शक्तिपीठ दर्शन सोहळा संस्थापक अध्यक्ष प्रभाकर राणे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई- जोगेश्वरी मंडळ, हडपीड स्वामी मठ गाव समिती आणि कोकण कट्टा विलेपार्ले यांच्या सहकार्याने होणार आहे. सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष श्री. प्रभाकर राणे, सचिव श्री. नंदकुमार पेडणेकर, खजिनदार ज्ञानेश्वर राऊत यांनी केले आहे.

Comments
Post a Comment