वेंगुर्लेत समुद्र किनाऱ्यावर साकारले श्री रामांचे वाळुशिल्प
वेंगुर्ले:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्लै तालुक्यातील सागरतीर्थ समुद्र किनाऱ्यावर आज रामनवमीचे औचित्य साधून प्रसिध्द वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी वाळू पासून प्रभू श्री रामांचे मनमोहक वाळूशिल्प साकारले आहे. हे शिल्प त्यांनी रांगोळी व वाळू या पासून साकारले असून वाळू शिल्प साकारण्यासाठी रविराज यांना दिडतासाचा कालावधी लागला. रविराज हे अशा प्रकारची अनेक वाळू शिल्पे साकारत असून देश विदेशातून अभ्यासक, पर्यटकही त्यांच्या भेटीला येत असतात. रविराज चिपकर यांच्या सारख्खा कलाकारांनमुळे सिंधुदुर्ग जिल्हाचा मान उंचावला जातो आहे.

Comments
Post a Comment