ग्रंथदिंडीने सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव २०२३ची कुडाळ मध्ये सुरुवात

 सिंधुदुर्गनगरी: परंपरिक वेशभूषेत... लेझीमच्या तालावर.. पुस्तक देती हमको ज्ञान, चांगले पुस्तक- चांगले शिक्षक घोषणा देत कुडाळ मधील  रा. ब. अनंत शिवाजी देसाई तथा टोपीवाला वाचनालय आणि ग्रंथ संग्रहालय येथून ग्रंथदिंडीची सुरुवात करण्यात आली. नगराध्यक्ष आफरीन करोल यांच्या हस्ते या ग्रंथ पुजनाने दिंडीचा शुभारंभ झाला.


 उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथ संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यामार्फत आयोजित सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव २०२३ ला आज कुडाळ येथे   सुरुवात झाली.  २७  आणि २८ मार्च या दोन दिवशी हा ग्रंथोत्सव कुडाळमध्ये आयोजित करण्यात आला आहे. ग्रंथदिंडीतील पालखीत भारताचे संविधान, भगवतगीता, विश्वकोष यांचा समावेश होता. राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष मंगेश मस्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे उपस्थित होते.

आजच्या ग्रंथ दिंडीमध्ये कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेज, बॅ नाथ पै विद्यालय, आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झाले होते. वाचनालय ते महालक्ष्मी हॉल पर्यंत कुडाळ बाजार पेठ मार्गे ही ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथ दिंडीमध्ये अनेक मान्यवरांचा सहभाग होता.


Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे