बांद्यात श्री रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात

 बांदा ता. ३०: येथे श्री रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. बांदा येथिल श्री विठ्ठल दुपारी ठिक १२:०० वाजता श्री रामजन्माचा सोहळा थाटात संपन्न झाला.रामनामाचा जयघोष करुन श्री रामाला पाळण्यात घालण्यात आले व सर्वांना सुंठवडा वाटण्यात आला. त्यानंतर  ढोल ताशांच्या गजरात प्रभु रामचंद्रांची पालखी मिरवणुक काढण्यात आली. याच वेळेत प्रतिवर्षाप्रमाणे श्री बांदेश्वर मंदिरातही श्री रामजन्माचा सोहळा साजरा झाला.ह.भ.प.श्रीपाद पणशीकरबुवांनी जन्मोत्सवाचे कीर्तन केल्यानंतर


प्रभुरामचंद्रांना पाळण्यात घालण्यात आले. त्यानंतर वाजतगाजत पालखी मिरवणूक निघाली. मार्गात दोन्ही पालख्यांच्या भेटीचा प्रतिवार्षिक सोहऴा झाला. श्री हनुमान सेवक कार्यकर्त्यांनी पालखी मार्गात श्री हनुमान मंदिरापाशी पालखी मिरवणुकरीता भाविकांसाठी शितपेय व्यवस्था केली होती.बांदा आळवाडा येथिल श्री साईमठ , संत सोहिरोबानाथ आंबिये मठ तसेच पानवळ येथिल श्रीराम पंचायतन मंदिरातही श्रीरामनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या उत्सवानिमित्त सर्वत्र मोठ्या उत्साहाचे वातावरण होेते.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे