बांदा पोलिसांच्या कारवाईत दारुसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

 गोवा बनावटीच्या दारूची आलिशान कारमधून अवैध वाहतूक करणाऱ्यावर बांदा पोलिसांनी कारवाई करत कारसह एकूण ६ लाख १८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी प्रशांत सोमनाथ येरकळ(रा.वरवंटी ता.लातूर) याला ताब्यात घेण्यात आले.ही कारवाई बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे,उपनिरीक्षक समीर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल प्रथमेश पोवार यांनी केली.


याबाबत मिळालेली माहिती अशी की बांदा वाफोली मार्गावर गणेश मंदिर जवळ रस्त्यावर गोव्यातून लातूर येथे जाणाऱ्या होंडा कंपनीच्या एमएच १४ एफएस ३६६३ ही गाडी तपासणीसाठी थांबवली असता या गाडीत गोवा बनावटीची दारू लपवून ठेवलेली आढळली.याप्रकरणी कार चालकावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ क ६५(अ),६५(इ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास बांदा पोलीस तेली करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे