श्री रामेश्वर मंदिर मिठबाव येथे ३० ला श्री रामनवमी उत्सव

 देवगड : श्री रामेश्वर उत्सव समिती मिठबाव तांबळडेग कातवण यांच्यावतीने गुरुवार दि ३० मार्च २०२३ रोजी रामनवमीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्री देव रामेश्वर मंदिर मिठबाब येथे करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ८ वाजता श्री रामेश्वर मंदिरात अभिषेक , सकाळी १० ते १२ किर्तन राम जन्म व आरती कीर्तनकार (के डी सावंतसर) दुपारी १२ ते ३ महाप्रसाद सायंकाळी ५ ते ६ यांचे स्वरसुधा क्रिएशनचा भक्ती संध्या कार्यक्रम,


सायंकाळी ७ ते ८ गायन रात्री ८ ते ९ भजन व रात्री ९:३० ते १२ मराठमोळा नजरांना कलांकर ग्रुप मालवण आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत . तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री रामेश्वर उत्सव समिती मिठबाव तांबळडेग कातवण यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे