कुडाळात १ व २ एप्रिलला आबा प्रक्रिया प्रशिक्षण व मार्गदर्शन
कोकणात असलेल्या विपुल प्रमाणातील फळांच्या उत्पादकांसाठी अभिनव उद्योग प्रबोधिनी विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबवत आहे.नुकत्याच अभिनव उद्योग प्रबोधिनीच्या वतीने घेण्यात आलेल्या 'फणस प्रक्रिया प्रशिक्षण' कार्यक्रमाला मिळालेल्या उस्फुर्त प्रतिसादा नंतर आता 'अभिनव उद्योग प्रबोधिनी' कोकणातील आंबा उत्पादकांसाठी आंब्यावर विशेष प्रशिक्षण कार्यक्रम कुडाळ येथे ०१ आणि ०२ एप्रिलला आयोजित केला आहे.
या कार्यक्रमात कैरी व आंब्यावर विविध प्रकारे प्रक्रिया करून खूप सारे प्रॉडक्टस तयार करणे शक्य आहे.
लोणची, पल्प, जॅम, सरबत, पोळी, बर्फी, बार, चॉकलेट, आमचूर पावडर, चुंदा, मुरंबा, पन्हं, जेली आणि वाइन असे अनेक प्रॉडक्ट्स प्रत्यक्ष बनविण्यास शिकवले जाणार आहे.
तसेच यासाठी लागणाऱ्या विविध मशिनरी, उत्पादन प्रक्रिया, लायसन्सेस, लेबलिंग, पॅकेजिंग, नुट्रिशनल व्हॅल्यू, कॉस्टिंग याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी
*टीम अभिनव*
8767473919
*अभिनव उद्योग प्रबोधिनी*
प्रशिक्षण, प्रोत्साहन, मार्गदर्शन येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment