कणकवली येथील फ्लॅटमध्ये आग;सुमारे ६ लाखांचे नुकसान

 कणकवली:शहरातील तेली आळी येथील पाताडे कॉम्प्लेक्सच्या एका फ्लॅट मध्ये आज पहाटे आग लागली. या लागलेल्या आगीत रेडिमेड कपडे व्यवसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही आग पहाटे ४:३० वाजण्याचा सुमारास लागली. घटनेची माहिती मिळतात. स्थानिकांनी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांना माहिती दिली. नगराध्यक्षांनी नगरपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ सूचना दिल्या. अग्निशमन बंब घटनास्थळी पाठवून त्याद्वारे आग आटोक्यात आणण्यात आली. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष घटनास्थळी दाखल झाले. कणकवली तेली आळी येथे कस्टम ऑफिस समोर असलेल्या पाताडे कॉम्प्लेक्स मध्ये एका फ्लॅट मध्ये मंगळवारी पहाटे च्या सुमारास लागलेली, आगीमुळे या फ्लॅट मधून धूर येऊ लागल्याने ज्यांनी ही आग पाहिली त्याने आसपासच्या लोकांना या बाबत माहिती दिली व त्यानंतर नगराध्यक्ष समीर नलावडे यांना कळविण्यात आले.


या फ्लॅटमध्ये आठवडा बाजाराला फिरून व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांनी आपले व्यवसायाचे लहान मुलांचे कपडे व अन्य रेडीमेड कपड्यांचे मटेरियल स्टॉक करून ठेवले होते. आठवडा बाजाराला व्यवसाय करण्याकरता तीन ते चार जणांनी येथे एकत्रित हे मटेरियल स्टॉक केलेले होते. दरम्यान या आगीमुळे व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले असून, नगरपंचायतच्या आठ कर्मचाऱ्यांद्वारे अग्निशमन बंबाच्या माध्यमातून आग आटोक्यात आणण्यात आली. यावेळी कणकवली शहरातील अनेकांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली होती. शॉर्ट सर्किटने आग लागली असण्याची शक्यता यावेळी वर्तवण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे