राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापिका गौरव पुरस्काराने सौ. माधवी सावंत सन्मानित
नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन (रजी) बेळगावी व इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी (रजी) ची. बेळगावी यांच्या तर्फे दिल्ली, गुजरात, गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातून आदर्शवत काम करणाऱ्या व्यक्तींची निवड राष्ट्रीय पुरस्कारासाठी करण्यात येते. शिक्षण क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असणाऱ्या आणि गेली काही वर्षे मुख्याध्यापक पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या सौ. माधवी मेघाजी सावंत सध्या खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदा येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. गोवा हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळ, गोवा यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात सौ. माधवी सावंत यांना त्यांच्या आदर्शवत कार्यामुळे हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
मा. केंद्रीय कायदा मंत्री वीरप्पा मोईली, मा.केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनुर, मा. खासदार अमरसिंह पाटिल यांनी पुरस्कार विजेत्यांचे कौतुक करत आपला आदर्श इतरांसमोर ठेवण्यासाठी आपला सत्कार करत असल्याचे म्हटले आहे. मनमिळावू स्वभावाच्या सावंत मॅडम यांचे विद्यार्थी, शिक्षक, पालक, संस्था कार्यकारिणी या सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Comments
Post a Comment