सावंतवाडीत श्रीराम नवमी निमित्ताने भव्य शोभायात्रा
सावंतवाडी:सावंतवाडी शहरात श्रीराम नवमी निमित्ताने आज विश्व हिंदू परिषदेच्या पुढाकाराने भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
यावेळी विश्व हिंदू परिषद ,इस्कॉन व हिंदू समुदायाने सहभाग घेतला होता. वाजत गाजत काढलेल्या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधले विश्व हिंदू परिषदेने यंदा प्रथमच श्रीराम जन्मोत्सव सावंतवाडी श्री देव नारायण मंदिर मध्ये साजरा केला.
आज सायंकाळी नारायण मंदिर कडून मुख्य रस्ता, बाजारपेठ,सालईवाडा, चितारआळी या मार्गाने शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी लहान मुलांचे लेझीम पथक, ढोल पथक तसेच इस्कॉन पथक अशा विविध हिंदू समुदायाच्या मान्यवरांनी यामध्ये सहभाग घेतला होता. रिक्षा युनियनच्या रिक्षांचा समावेश होता.
विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष अजित फाटक यांच्या पुढाकाराने ही शोभायात्रा आज करण्यात आली. त्यांना अरुण वझे, जगदीश मांजरेकर, सुधीर पराडकर, सुनील सावंत, चिन्मय रानडे, किशोर चिटणीस, व मान्यवरांनी शोभायात्रा काढण्यासाठी सहभाग घेतला होता.

Comments
Post a Comment