कोकण रेल्वे ट्रॅकवर पाडलोस येथे सापडला मृतदेह

 बांदा,ता. २७: पाडलोस-भाकरवाडी परिसरात रेल्वे ट्रॅकवर अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. ही घटना काल रात्री उशिरा उघडकीस आली. संबंधित युवक हा २५ ते ३० वर्ष वयोगटातील असून तो रेल्वेतून खाली कोसळल्याचा अंदाज आहे. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच बांदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. मात्र अद्याप त्याची ओळख पटविण्यास पोलिसांना यश आले नाही.


याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित युवक हा परप्रांतीय असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तर त्याच्या खिशात आढळून आलेल्या मडगाव पर्यंतच्या रेल्वे तिकिटावरून तो गोवा येथे जात असल्याचे उघड होते. मात्र अन्य कोणतेही ओळखपत्र त्याच्याकडे न सापडल्याने त्याची नेमकी ओळख पटू शकली नाही. दरम्यान मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस येताच बांदा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर तो शवविच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला आहे. त्यासाठी रुग्णवाहिका चालक तथा युवा सामाजिक कार्यकर्ते हेमंत वागळे यांनी पोलिसांना सहकार्य केले. या प्रकरणाचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे