मसुरे भरतेश्वर मंदिर येथे ३० मार्च रोजी रामनवमी उत्सव...

मसुरे:कसबा मसुरे गावचे ग्रामदैवत ३६० खेड्यांचा अधिपती राजा श्री देव जैन भरतेश्वर मंदिर देऊळवाडा येथे गुरुवार दिनांक 30 मार्च रोजी रामनवमी  उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.  सकाळी ९:३० वाजाता पुराण वाचान, १० वाजता कीर्तन, १२ वाजता श्री प्रभूराम जन्मोत्सव, १२:४५ वाजता महाआरती, १:१० शाही श्रींचा पालखी सोहळा, १:३० वाजता महाप्रसाद, शुक्रवार दिनांक ३१ मार्च रोजी लळीत कार्यक्रम होणार आहे. रात्रौ ९:३० वाजता पुराण वाचन, १० वाजता शाही पालखी सोहळा तदनंतर  १०:२० वाजता शक्तीपीठ श्री माऊली मंदिर येथे श्रींच्या शाही पालखीचे प्रस्थान व माऊली मंदिर येथे शिव शक्ती भेट , १०: ४५ वाजता कीर्तन, ११ : २५ वाजता माऊली मंदिर येथून श्रींच्या शाही पालखीचे भरतेश्र्वर मंदिरकडे प्रस्थान, १२ वाजता दशावतार नाटक . असा सोहळा संपन्न होणार असून या या सोहळ्यात सर्व भाविकांनी उपस्थीत राहून श्रींचे शुभाशीर्वाद घ्यावेत. 


असे आवाहन श्री देव जैन भरतेश्वर मंदिर ट्रस्ट व सर्व मानकरी गाव रहाटी कसबा मसुरे यांनी केले आहे...

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे