गोवा ते सिंधुदुर्ग लक्झरी प्रवास सुरु करणार:केसरकर
सावंतवाडी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दोन हजार नवीन एसटी बसेस टप्प्याटप्प्याने राज्यातील आगारांना देण्यात येत आहेत . त्यातील सावंतवाडी आगारासाठी मंजूर १० पैकी ६ नव्या गाड्या डेपोत दाखल झाल्या आहेत . शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याहस्ते ह्या नव्या लालपऱ्यांचे लोकार्पण सोमवारी करण्यात आले . यावेळी मंत्री केसरकर म्हणाले , ‘ निर्णय वेगवान , महाराष्ट्र गतीमान ' अशी जाहीरात असलेल्या एका एसटीचा पत्रा खराब झाला होता . यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती . यानंतर नव्या कोऱ्या एसटी देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे . असा निर्णय घेण्याची धमक ही फक्त शिंदे - फडणवीस सरकारमध्ये आहे .
एसटी बसची दयनीय अवस्था झाली आहे . त्या संदर्भात अनेक तक्रारी आल्या होत्या . त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांची दखल घेऊन नवीन बसेस पुरविण्याची मोहीम सुरू केली . यातील पहिल्या टप्प्यात आलेल्या सहा एसटींचे लोकार्पण शिक्षणमंत्री यांनी केले . यावेळी ते म्हणाले , गोवा व सिंधुदुर्ग असा लक्झरीअस प्रवास पर्यटकांसाठी सुरु करण्याचा मानस आहे . गोवा आणि सिंधुदुर्गच्या पर्यटनस्थळांना यामुळे पर्यटक भेट देतील . त्याचप्रमाणे पर्यटन वृद्धी होईल , असेही प्रतिपादन केसरकर यांनी केले . नव्या एसटीच्या लोकार्पणानंतर त्यांनी बसमधून सावंतवाडी शहराची सफर केली . यावेळी त्यांनी पत्रकार , नागरीक यांच्याशी संवाद साधला .

Comments
Post a Comment