योग ज्योती ग्रुपतर्फे मालवणात १०८ सूर्यनमस्कार
मालवण, ता. २५ : येथील योग ज्योती ग्रुपतर्फे महिला दिन व गुढीपाडवा हिंदू नववर्षाचे औचित्य साधून मामा वरेरकर नाट्यगृह येथे १०८ सूर्यनमस्कार घालण्यात आले. योग प्रशिक्षिका दीपा वनकुद्रे यांच्या नेतृत्वाखाली ३१ महिला योग साधक सहभागी झाल्या होत्या.
यामध्ये लहान मुलींपासून तरुण ते वयस्कर महिला सहभागी झाल्या होत्या. यामध्ये पारंपरिक नऊवारी साडी नेसून महिलांनी १०८ सूर्यनमस्कार घातले. योग साधना करण्यास वयाचे किंवा कपड्यांचे कोणतेही बंधन नसते, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

Comments
Post a Comment