मडूरा डीगवाडी येथे एकाच दिवशी दोन ठिकाणी काजू बागायतींना आग

 मडुरा डिगवाडी परिसरात आज महावितरणच्या विद्युतवाहिन्यांमध्ये शॉर्टसर्किट होऊन दोन ठिकाणी काजू बागायतींना आग लागली. आग विझविताना ६५ वर्षीय शेतकरी तथा माजी सैनिक दशरथ देसाई हे अत्यवस्थ झालेत. त्यांना उपचारासाठी बांदा येथे हलविण्यात आले आहे. महावितरण विभागाला कळवूनही घटनास्थळी कोणीही न आल्याने शेतकर्‍यांनी संताप व्यक्त केला.


मडुरा गावात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची ही यंदाची पाचवी घटना आहे. सहाय्यक अभियंत्यांसह लाईनमन व वायरमन कोणतीही कार्यवाही करीत नसल्यामुळे दिवसेंदिवस शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मात्र याचे सोयरसुतक नसल्याच्या आविर्भावात महावितरणचे अधिकारी वागत अाहे. केवळ बीले वसुलीकरिता कार्यतत्पर असलेले कर्मचारी सेवा पुरविण्यात कामचुकारपणा करीत असल्याने शेतकरी व स्थानिकांमध्ये तीव्र संताप आहे.

मडुरा डीगवाडी येथील परुळेकर यांच्या कारखान्या नजीकच्या काजू बागायतीला शॉर्टसर्किट होऊन दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आग लागली. शेतकरी प्रकाश वालावलकर यांनी आपल्या कामगारांसह धाव घेत आगीवर वेळीच नियंत्रण मिळविले. यात उत्तम वालावलकर, पूर्वा धुरी, समिक्षा धुरी, सुवर्णा धुरी, सानवी धुरी, शिवानी शेळके यांचा समावेश होता.तर दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्याच परिसरात वरच्या दिशेने शॉर्टसर्किट होऊन आग लागली. आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र माहिती देऊनही महावितरणसह शासकीय यंत्रणेने मात्र घटनास्थळी पाठ फिरविली.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे