सप्तरंग कलामंच होडावडा दशक पुर्ती सांस्कृतिक महोत्सव थाटात संपन्न

गावच्या विकासात सप्तरंग कलामचं मंडळचां हातभार मोलाचा:जनार्दन शेट्ये सामाजिक कार्यकर्ते 

वेंगुर्ला प्रतिनिधी:होडावडे गावातील सप्तरंग कलामंच हे मंडळ विविध सामाजिक सांस्कृतिक आरोग्य विषयक उपक्रम राबवून गावच्या विकासात मोलाची कामगिरी बजावत आहे .सतरंग कला मंच हे गावच्या विकासासाठी झटणारे आदर्श वंत मंडळ आहे असे मत सामाजिक कार्यकर्ते जनार्दन शेट्ये यांनी होडावडे येथील सप्तरंग कला मंचाच्या दशक वर्ष पूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मत व्यक्त केले.



  होडावडे गावातील सप्तरंग कला मंच यास दहा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विविध कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी केले होते .सप्तरंग कला मंचाने संत गोरा कुंभार या नाट्यप्रयोगाचे जवळपास 24 नाटय प्रयोग केले आहे. तसेच विविध उपक्रम या मंडळामार्फत गावात राबवले जातात यावर्षी दशक पूर्ती सोहळ्यानिमित्त खास गावातील महिला वर्गासाठी  खेळ पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर , तसेच विवध करमणूक कार्यक्रम आयोजीत केले होते तर अद्वैत क्रियेशन निर्मित कलांकुर ग्रुप मालवण प्रस्तुत धम्माल विनोदी नाटक ,प्रेमाचा झांगडगुत्ता, हा नाटय प्रयोग आयोजीत केला होता. त्याला रसिकवर्ग यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.

 या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते जनार्दन शेट्टये, जिल्हा परिषद सदस्य नितीन शिरोडकर,बाळासाहेब शिवसेना पक्षाचे वेंगुर्ला तालुकाप्रमुख  नितीन मांजरेकर ,उपतालुकाप्रमुख देवा कांबळी,होडावडे सरपंच रसिका केळुसकर, सदस्य अरविंद नाईक होडावडे  ग्रामोन्नती मंडळ मुंबई माजी सचिव विठ्ठल मेस्त्री ,काजू उद्योजक प्रकाश शेटकर ,श्रेया पै ग्रामपंचायत सदस्य अमृता साळगावकर,रामचंद कुडाळकर, सप्तरंग कलामंच होडावडे रामकृष्ण मेस्त्री, तसेच सप्तरंग कलामंच होडावडे मंडळ चे पदाधिकारी ,कार्यकर्ते तसेच मान्यवर यावेळी मोठ्यप्रमाणात उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा नारायण परब,प्रास्ताविक उमेश पावणोजी तर आभार सप्तरंग कलांमचंचे अध्यक्ष रामकृष्ण मेस्त्री यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे