एसपीके महाविद्यालयाच्या वतीने लोककला जतन करणाऱ्या कलाकारांचा सत्कार
सावंतवाडी । प्रतिनिधी : श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वतीने महाराष्ट्र शासन लोककला अनुदान शिफारस समिती सदस्य पदी निवड व दशावतार लोककला जतन करणाऱ्या कलाकारांचा सत्कार संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले व युवराज्ञी श्रद्धाराजे लखमसावंत भोंसले यांच्या हस्ते शाल, सन्मान चिन्ह, श्रीफळ, देऊन सत्कार करण्यात आला .
महाराष्ट्र शासनाने राज्यातील लोक कलावंतांच्या पथकांना भांडवली खर्चासाठी ,प्रयोग अनुदान मंजूर करण्यासाठी लोककला अनुदान शिफारस समिती ची स्थापना केली आहे. या समिती वर सदस्य पदी नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचे संचालक तुषार नाईक व चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचे संचालक देवेंद्र नाईक यांची निवड झाली आहे .तसेच महापुरुष दशावतार नाट्य मंडळाचे संचालक गौरव शिर्के यांना कला व सांस्कृतिक संचनालय गोवा राज्य यांच्या वतीने राष्ट्रीय दशावतार कला पुरस्कार मिळाला आहे. या करिता त्यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला.
तसेच या प्रसंगी उपस्थित दशावतार चालक-मालक संघटनेचे सचिव सचिन पालव यांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे सदस्य डॉ. सतीश सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल, प्रा डी डी गोडकर, प्रा एम ए ठाकूर, प्रा सौ. एन डी धुरी, डॉ. बि. एन हिरामणी , कला सांस्कृतिक विभागाचे समन्वयक डॉ. डी जी बोर्डे ,सहसमन्वयक डॉ. एस एम बुवा उपस्थित होते .

Comments
Post a Comment