भालावल धनगरवाडी पुलासाठी निधी उपलब्ध करून देणार:खा.राऊत
सावंतवाडी,ता.१५: भालावल-धनगरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुल उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी दिले. दरम्यान धनगरवाडीवर जाण्यासाठी पायाभूत सुविधांची गरज आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा आदर ठेवला जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.
खासदार विनायक राऊत यांनी भालावल येथील श्रीदेवी तांब्याची वाघजाई कोकरे परिवार त्रिवार्षिक गोंधळ कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली होती. यावेळी उपस्थित धनगर समाजाच्या बांधवांना शुभेच्छाही त्यांनी दिल्या. यावेळी विकास कामांवर चर्चा झाली. त्यावेळी स्थानिक प्रश्न सुद्धा चर्चा करत भालावल धनगरवाडी जाणारा रस्त्या वरील पुल बांधण्यासाठी वीस लाखाचा निधी देण्याचे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी स्थानिकांना दिले. यावेळी मोठ्या संख्येने गोंधळासाठी धनगर समाजातील बांधव उपस्थित होते.
यावेळी तालुका प्रमुख रूपेश राऊळ, चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत माजी पंचायत समिती सदस्य विश्राम कांबळी, उपतालुकाप्रमुख आबा सावंत ,रियाज खान आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment