इस्लामपूर व्यायाम शाळा 'यंगस्टार चषक' विजेता

 कणकवली : यंगस्टार मित्रमंडळइ कणकवली आयोजित यंगस्टार चषक २०२३ कबड्डी स्पर्धेत इस्लामपूर व्यायाम शाळा विजेता तर यंगस्टार कणकवली संघ उपविजेता ठरला.


या स्पर्धेत १२ संघांनी सहभाग घेतला. अतिशय झालेल्या चुरशीच्या झालेल्या सामन्यात अखेर इस्लामपूर व्यायामशाळा या संघाने बाजी मारत यंगस्टार चषकावर आपले नाव कोरले. यात इस्लामपूर व्यायामशाळा आणि शिवमुद्रा कौलव यांचा पहिला उपांत्य फेरीचा सामना रंगला. दोन गुणांनी विजयी होत इस्लामपूर व्यायाम शाळा संघाचे अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य फेरीत शिवभवानी सावंतवाडी आणि यंगस्टार कणकवली यांच्यात सामना रंगला. दोन गुणांनी विजय होत यंगस्टार कणकवली अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामना इस्लामपूर व्यायामशाळा आणि यंगस्टार कणकवली या दोन संघांमध्ये झाला यामध्ये इस्लामपूर व्यायामशाळा १० गुणांनी विजय होत यंगस्टार चषकावर आपले नाव कोरले.तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमादरम्यान माजी खासदार निलेश राणे व भाजप युवा नेते विशाल परब यांनी भेट देत यंगस्टार मित्रमंडळ, क्रीडा रसिक व सहभागी संघांना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले.

या स्पर्धेत विजेत्या संघाला २५,०२७ हजार व चषक, उपविजेता संघास २०,०२७ हजार व चषक, तर तृतीय आणि चतुर्थ संघास ५०२७ व चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचा उत्कृष्ट चढाई हृषीकेश कांबळे, उत्कृष्ट पकड सुमीत गावडे, अष्टपैलू खेळाडू सौरभ कुलकर्णी, बोनस किंग शिवलिंग पाटील यांना गौरविण्यात आले.

पारितोषिक समारंभ वेळी अध्यक्ष अण्णा कोदे, समीर साई, नंदू उबाळे, अभय खडपकर, पत्रकार रमेश जोगळे, विवेक वाळके, भरत उबाळे, नंदू वाळके, रुपेश परब, अरुण जोगळे, अमिता राणे, प्रियांका कोरगावकर, रुपेश केळुसकर, रुपेश वाळके, ललित राणे, मेहुल धुमाळे, संजय मालंडकर, व्यंकटेश सावंत, सागर राणे, तुषार मोरे, ऋषी वाळके, अक्षय चव्हाण, मयूर पेडणेकर संतोष जोगळे, नाना कोदे, अभिषेक चव्हाण, रवींद्र सावंत, ऋतिक चौगुले, पंकज पेडणेकर, ओंकार हळदीवे, संदेश आरडेकर, चिन्मय माणगावकर, ओमकार सुतार, बंटी तहसीलदार, परेश वाळके, प्रतीक कडूलकर व पंच म्हणून श्री. वासुरकर, राजेश शिंगनाथ, सुदिन पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळू वालावलकर यांनी केले तर आभार अण्णा कोदे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे