हिंदू राष्ट्र जागृती वाहन फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद....!
ज्ञानदीप हायस्कूल वायंगणी येथे ४ मार्चला होणाऱ्या हिंदू राष्ट्र जागृती सभेच्या निमित्ताने आयोजित वाहन फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सकाळी १०. ३० वाजता श्री रामेश्वर मंदिर आचरा येथून या वाहन फेरीचा प्रारंभ होऊन आचरा तिठा, बाजार पेठ, हिर्लेवाडी मार्गे, वायंगणी, श्री स्वामी समर्थ मठ, आचरा हायस्कूल येथून आचरा तिठा येथे वाहन फेरीचा समारोप झाला. वाहन फेरीत असंख्य वाहने घेऊन युवक, युवतीं सहभागी होऊन "हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी" च्या गर्जने परिसर दणाणून सोडला. यामध्ये दुचाकी, तीन चाकी, चारचाकी वाहनांचा समावेश होता.
यावेळी हिंदू जनजागृती समितीच्या हेंमत मणेरीकर यांनी ४ मार्चला होणाऱ्या हिंदू राष्ट्र जागृती सभे बाबत मार्गदर्शन केले.

Comments
Post a Comment