तेरवण-मेढे येथील पांडवकालीन श्री नागनाथ मंदिराचा जीर्णोद्धार प्रारंभ
दोडामार्ग तालुक्यातील प्रसिद्ध पांडवकालीन तीर्थक्षेत्र तेरवण मेढे येथील श्री देव नागनाथ मंदिराचा जीर्णोद्धार होणार असून यासाठी परिसरातील भाविक , भक्तगणांनी मंदिरासाठी आर्थिक सहकार्य करावे , असे आवाहन श्री देव नागनाथ देवस्थान स्थानिक उपसमिती व ग्रामस्थ तेरवण मेढे यांनी केले आहे . दोडामार्ग तालुक्यातील प्रसिद्ध पांडवकालीन तीर्थक्षेत्र तेरवण मेढे येथील श्री देव नागनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे निश्चित झाले होते . त्याबाबतच्या प्राथमिक कामाचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला .
दोडामार्ग तालुक्यातील तेरवण मेढे येथील श्री देव नागनाथ मंदिर हे पांडवकालीन तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे . दोडामार्ग तालुका सिंधुदुर्ग , कोल्हापूर , बेळगाव , गोवा येथील भक्तगण मोठ्या संख्येने तेरवण मेढे येथे दरवर्षी महाशिवरात्री दिवशी मोठी हजेरी लावतात . यावर्षी श्री देव नागनाथमंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प केला आणि नुकताच शनिवारी प्राथमिक शुभारंभ करण्यात आला . प्रतिवर्षी होणारा महाशिवरात्री उत्सव येत्या १७ व १८ फेब्रुवारीला होणार आहे . मंदिराच्या ठिकाणी कामाची लगबग सुरू झाली आहे तसेच यावर्षी जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले असून मुख्य गाभाऱ्याच्या बाजूचे बांधकाम पाइले आहे . यामुळे महाशिवरात्री उत्सवादरम्यान भाविकांना सुयोग्य दर्शन घेण्यासाठी देवस्थान कमिटीकडून तात्पुरता मंडप उभारण्यात आला आहे . पांडवकालीन गाभारा तसाच ठेऊन नवीन मंदिराचे काम पुराणकालीन वारसा व ओळख असलेले दोडामार्ग तालुक्यातील व तीन राज्याच्या सीमेवर असलेले तेरवण मेढे येथील पांडवकालीन तीर्थक्षेत्र श्री देव नागनाथ मंदिर प्रसिद्ध आणि समस्त भाविकांचे श्रद्धास्थान आहे . तीच मुख्य गाभारा वास्तू ठेऊन नूतन मंदिराचे बांधकाम करण्यात येणार आहे . यासाठी भाविकांनी या मंदिराच्या जीर्णोद्धार कामासाठी सढळ हस्ते मदत करावी , असे आवाहन श्री देव देवस्थान स्थानिक नागनाथ उपसमिती व तेरवण मेढे ग्रामस्थांनी केले आहे . उत्सवाचे नियोजन सोमवारी दोडामार्ग तहसीलदार अरुण खानोलकर यांच्या अध्यक्षतेखाली व श्री देव नागनाथ देवस्थान स्थानिक उपसमिती तेरवण मेढे अध्यक्ष देऊ गवस , पदाधिकारी , ग्रामस्थ व तालुक्यातील संबंधित विभागाच्या शासकीय प्रतिनिधींची बैठक तेरवण मेढे येथे झाली . यावेळी महाशिवरात्री नियोजन करण्यात आले .

Comments
Post a Comment