गोवा पोलीस संघ ठरला वझरे येथील 'फ्रेंड सर्कल चषक' स्पर्धेचा विजेता

 दोडामार्ग | शिवशक्ती युवामंच वझरे आयोजित ' फ्रेंड सर्कल चषक २०२३'च्या क्रिकेट स्पर्धेत गोव्यातील गोवा पोलीस संघाने हेमहिरा दोडामार्ग संघाचा पराभव करत अंतिम विजेतेपद पटकावले . गोवा पोलीस संघाच्या संदेश ठाकूर याने केलेली फटकेबाजी क्रीडा रसिकांना भुरळ घालणारी ठरली . विजेत्या गोवा पोलिस संघाला रोख १ लाख रुपये व सात फूट उंच भव्य चषक देऊन सन्मानित करण्यात आले .


१५ फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी झाला . तत्पूर्वी सकाळी उपांत्य फेरीच्या सामन्यात गोवा पोलीस संघाने ध्रुव पार्से गोवा संघाचा तर हेमहिरा दोडामार्ग संघाने ग्रीतिक रॉयल्स साटेली भेडशी संघाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला . संध्याकाळी खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात गोवा पोलीस संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.सुरुवातीला हेमहिरा दोडामार्ग संघाने भेदक गोलंदाजी केली . त्यामुळे पहिल्या ३ षटकात गोवा पोलीस संघाची स्थिती ५ बाद १७ अशी झाली . मात्र त्यानंतर मैदानात उतरलेल्या संदेश ठाकूर याने षटकार व चौकरांची आतषबाजी केली . तर त्याला प्रवीण राणे यानेही चांगली साथ दिली . त्यामुळे गोवा पोलीस संघ ८ षटकात ८१ धावांपर्यंत पोहोचू शकला . या आव्हानाचा पाठलाग करताना भेदक गोलंदाजी समोर दोडामार्ग संघ कोलमडला . या सामन्यात गोवा पोलीस संघाने एकतर्फी विजय संपादन करत विजेतेपद पटकावले . अंतिम सामन्यात संदेश ठाकूर सामनावीर ठरला . स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण , वझरे सरपंच सुरेश गवस उपसरपंच चंद्रकांत नाईक , नगरसेवक राजेश प्रसादी , मनोज पार्सेकर , नारायण दळवी , रंगनाथ गवस , बाळा शिरोडकर , दिनेश सावंत , निखिल मयेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या स्पर्धेतील दोडामार्ग संघाचा सूचित नानचे मालिकावीर ठरला . स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून संदेश ठाकूर , उत्कृष्ट फलंदाज सुदन ठाकूर ( ध्रुव पार्से ) , उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रंजन केणी ( दोडामार्ग ) तर उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून स्वप्नील मळीक यांना गौरवण्यात आले . स्पर्धेत पंच म्हणून संदीप रुद्रे , अरुण घाडी , संजय हळदणकर यांनी काम पाहिले तर समालोचन जय भोसले , शुभम सावंत , महादेव शिरोडकर यांनी केलं .

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे