सावंतवाडी नगर परिषदेत आधुनिक अग्निशमन बंब दाखल
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी नगर परिषदेसाठी अग्निशामक केंद्र सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून गुरुवारी रात्री उशिरा ५५ लाख रुपये किमतीचा फायर फायटर नगरपरिषदेमध्ये दाखल झाला आहे.
सावंतवाडी शहरात अद्ययावत अग्निशामक बंब नसल्यामुळे आग विझवण्यासाठी मोठ्या अडचणी येत होत्या. केवळ सावंतवाडी नगर परिषद क्षेत्रातच नव्हे तर आसपासच्या ग्रामीण भागांमध्ये घडणाऱ्या आगीच्या घटना रोखण्यासाठी अद्ययावत अग्निशामक केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात होते.

Comments
Post a Comment