सावंतवाडीच्या सुनील नाईक क्रिकेट अकॅडमीच्या सर्वेश सावंतची झंजावती खेळी
सावंतवाडी,ता.१४: पणजी येथे सुरू असलेल्या तिसवाडी झोन बी डिव्हिजन सामन्यांमध्ये सावंतवाडीतील सुनील नाईक क्रिकेट अकॅडमीच्या सर्वेश सावंतने चमकदार कामगिरी करत द्विशतक ठोकले. त्याने १३१ चेंडूत तब्बल २२० धावा काढल्या. यात २१ चौकार, तर सहा षटकारांचा समावेश आहे. तो गोमेको स्पोर्ट्स क्लब कडून खेळला होता.
याच स्पर्धेत आदित्य नाईक यांनी आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यांनी ४० चेंडूत ५०;धावा जमवल्या. यात पाच चौकार आणि एक षटकारचा समावेश आहे. गोमेको स्पोर्ट्स क्लब ने प्रथम फलंदाजी करताना ४४.४ षटकात सर्व गडीबाद ३९४ धावा जमवल्या. यात सर्वेश सावंत यांचे २२० धावा ,आदित्य नाईक ५० धावा आणि प्रथमेश गावडे ३५ धावा, प्रत्युत्तर खेळताना अकबर स्पोर्ट्स क्लब यांनी ३४८ धावा जमवल्या प्रथमेश गावडे यांनी १ बळी आदित्य नाईक यांनी ३ वळी घेतले.
सर्वेश सावंत याच्या द्विशतकी खेळीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहेत. सर्वेश सावंत आदित्य नाईक आणि प्रथमेश गावडे हे तीनही खेळाडू सुनील नाईक अकॅडमी सावंतवाडी येथे प्रशिक्षण घेत आहेत. सुनील नाईक क्रिकेट अकॅडमीला किरण मेस्त्री यांचे प्रशिक्षण लाभत आहे. व अबू भडगावकर हे सल्लागार म्हणून कार्य करत आहे आहेत.

Comments
Post a Comment