बांद्यात रंगणार 'बांदा चॅम्पियन्स'चा थरार
हुसेन मकानदार आणि साई काणेकर मित्रमंडळ बांदा आयोजित बांदा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२३(बी.सी.टी) क्रिकेट स्पर्धा २५,२६ व २८ फेब्रुवारीला येथील श्री पाटेश्वर मैदानावर होणार आहे.या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे.
या स्पर्धेत मोरया ट्रान्सपोर्ट, गौरव स्पोर्ट्स,आपटेश्वर फायटर्स,श्री स्वामी समर्थ इलेव्हन बांदा,बांदेश्वर बांदा,एम्.सी.सी.बांदा,मायरा स्पोर्टस, बांदेश्वर बांदा सिंहगर्जना हे संघ सहभागी झाले आहेत.
या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रोख २५ हजार आणि भव्यदिव्य आकर्षक चषक,द्वितीय पारितोषिक रोख १५ हजार व आकर्षक चषक तर तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी रोख ५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहेत.तसेच स्पर्धेत वैयक्तिक स्वरूपाची इतर बक्षिसेही ठेवण्यात आली आहे.यंदाच्या हंगामातील या मैदानावर होणारी ही पहिली स्पर्धा आहे.

Comments
Post a Comment