आंबेगाव येथील शिक्षकाचे आकस्मिक निधन

 सावंतवाडी,ता.१४: आंबेगाव येथील शाळा नंबर १ चे शिक्षक सागर आप्पासो पाटील (३६) यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने भटवाडी येथील राहत्या घरी निधन झाले. ते मुळचे गिजवणे-गडहिंग्लज येथील आहेत. त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी याबाबतची कल्पना शेजाऱ्यांना दिली. मात्र उपचाराला जाण्यापूर्वीच ते घरात कोसळले. त्यानंतर त्यांना येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु तत्पूर्वी त्यांचे निधन झाले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.


श्री. पाटील हे मनमिळाऊ होते. त्यांच्या अचानक जाण्याची बातमी कळल्यानंतर सावंतवाडी कुटीर रुग्णालयात शिक्षकांनी गर्दी केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई-वडील असा परिवार आहे. सहा महिन्यापूर्वी त्यांची पत्नी गडहिंग्लज येथे ग्रंथपाल म्हणून जॉईन झाली होती. त्यामुळे ते घरात एकटेच होते.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे