उद्या सावंतवाडीत ठाकरे पक्षाचा 'शिवगर्जना' मेळावा
सावंतवाडी,ता.२५: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवगर्जना मेळावा उद्या होणार आहे. येथील आदिनारायण कार्यालयात हा मेळावा सायंकाळी पाच वाजता होणार आहे , अशी माहिती तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी दिली.
यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, उपनेते मीना कांबळे, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, लोकसभा समन्वयक प्रदीप बोरकर प्रमुख उपस्थित राहणार आहे. तरी सर्व पदाधिकारी, उपतालुका प्रमुख, उपतालुका संघटक, विभागप्रमुख, विभाग संघटक, उपविभाग प्रमुख, सर्व शाखाप्रमुख,बुथप्रमुख, सरपंच,सर्व उपसरपंच, सर्व ग्रा.प.सदस्य, नगरसेवक, सर्व महिला आघाडी, युवासेना, सर्व सेल्सच्या पदाधिकारी, सर्व आजी,माजी, पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री.राऊळ यांनी केले आहे.

Comments
Post a Comment