जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्रावणी,अंकिता प्रथम

 बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला आयोजित सलग २२ व्या वर्षी शिवजयंती निमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत शालेय गटातून श्रावणी राजन आरावंदेकर (दाभोली) तर खुल्या गटातून अंकिता सुहास नाईक (सावंतवाडी) यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.


   खुल्या गटातून दहा तर शालेय गटातून सोळा स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. शालेय गटातून द्वितीय-अदिती विवेक चव्हाण, तृतीय-यशराज महेश नाईक तर उत्तेजनार्थ प्रथम-वरदा संदीप परब (सर्व वेंगुर्ला) व द्वितीय-नाविन्य सचिन डोळस (मालवण) यांनी प्राप्त केला.


     खुल्या गटातून द्वितीय-प्रसाद विश्वनाथ खडपकर (नवाबाग), तृतीय -राहुल विलास वाघदरे (घारपी-सावंतवाडी),  उत्तेजनार्थ प्रथम-करण लक्ष्मण करंगुटकर (वेंगुर्ला) व द्वितीय-श्रुती श्रीधर शेवडे (परबवाडा) यांनी प्राप्त केला.

स्पर्धेचे बक्षिस वितरण प्राचार्य डॉ.विलास देऊलकर, सुरेंद्र चव्हाण, माजी अधिक्षक प्रदिप परब, परीक्षक बी.टी.खडपकर, प्रा. शशांक कोंडेकर, अजित राऊळ व प्रा.वामन गावडे यांच्या हस्ते झाले.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे