चिंदर सेवा संघ आयोजित भगवंतगड किल्ला येथे शिवजयंती उत्साहात संपन्न
प्रतिनिधी/ चिंदर-शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला, शेकडो वर्षाची काळरात्र चिरून, स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने सगळा आसमंत तेजोमय बनवणारा शिवसुर्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय आज त्यांची 393 वी जयंती, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील चिंदर भगवंतगड किल्ला येथे चिंदर सेवा संघाने उत्साहात साजरी केली. कार्यक्रमाची सुरूवात दीप प्रज्वलनाने झाली. उपसरपंच दिपक सुर्वे व किशोर परुळेकर यांच्या हस्ते शिवछत्रपतीच्या मूर्तीला व सिध्देश्वराला पुष्पहार अर्पण करण्यात आला. किंजन परब हिने शिवाजी महाराजांनवर भाषण, भूषण दत्तदास यांने "आम्ही छत्रपतींचे शिलेदार, करूनी त्रिवार मुजरा,
घालून लोटांगण चरणांवर, शिवजयंती करीतो साजरा" हि कविता तर आशिष कोरगांवकर याने "एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाच नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर" हा पोवाडा सादर केला. केंद्राप्रमुख प्रसाद चिंदरकर व राजेंद्र गाड यांनी शिवरायांन बाबत आपले विचार मांडले.
यावेळी चिंदर उपसरपंच दिपक सुर्वै, केंद्र प्रमुख प्रसाद चिंदरकर, सदाशिव गोसावी, किशोर परुळेकर, चिंदर सेवा संघ खजिनदार गणेश गोगटे, मारूती हडकर, गणेश पाताडे, उपाध्यक्ष विवेक परब, रोहन गांवकर, रविंद्र गोसावी, सिध्देश नाटेकर, विश्राम माळगांवकर, शिक्षक राजेंद्र गाड, विद्यार्थी, शिवप्रेमी उपस्थित होते.
आज महाराष्ट्र राज्यगीत म्हणून जाहिर झालेले " जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा" हे गीत सर्वांनी एक सुरात गायीले. कार्यक्रमाचे प्रास्तविक व समारोप सचिव ओमकार गोलतकर यांनी केले.

Comments
Post a Comment