बांदा येथील स्वयंभू श्री बांदेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव
बांदा,ता.१६: येथील प्रसिद्ध व जागृत अशा स्वयंभू श्री देव बांदेश्वर मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. महाशिवरात्री शनिवार १८फेब्रुवारीला असून शुक्रवारी रात्री पालखी सोहळ्याने हा उत्सव आरंभ होईल
.
यानिमित्त पुढीलप्रमाणे कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवार १७ फेब्रुवारीला रात्रो ९ ते १२ श्री बांदेश्वर मंदिराभोवती श्रींची सवाद्य पालखी प्रदक्षिणा होणार आहे. शनिवार १८ फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी सुर्योदयापासुन ते दुसऱ्या दिवशी सुर्योदयापर्यंत स्वयंभू लिंगावर अष्टौप्रहर रुद्रावर्तनद्वारा अभिषेक होईल. सकाळी ८ ते दुपारी ३पर्यंत श्री शिवलिलामृत ग्रंथ पारायण होईल.सायं ३.३० ते ८.३० या वेळेत विविध भजनी मंडळांच्या भजनाचा कार्यक्रम होईल. रात्रौ ९ ते १२ श्रींची मंदिराभोवती सवाद्य पालखी प्रदक्षिणा होईल.
रविवार १९ फेब्रुवारीला सायं ५ वा. श्रींची पालखी मिरवणुक वाजत गाजत श्री पाटेश्वर मंदिराकडे प्रस्थान करील . श्री पाटेश्वर मंदिरातील भजनानंतर पालखीचे पारंपारिक राजमार्गाने मंदिरापाशी आगमन होईल. त्यानंतर मंदिराभोवती प्रदक्षिणाकरून व भजन करुन पालखीचे पुन्हा मंदिरात आगमन होईल. यावेळी महाआरती करण्यात येईल. रात्रौ १० वाजता तेंडोलकर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ यांच ” पुण्यप्रभाव” हा नाट्यप्रयोग सादर होईल. सोमवार २०फेब्रुवारीला श्रींची साप्ताहिक पालखी फेरी होईल. मंगळवार २१ फेब्रुवारीला दुपारी १ ते ३ या वेळेत समाराधना होऊन या सोहळ्याची सांगता होईल. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देव बांदेश्वर भुमिका देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment