कु.प्रणाली चिकटेच्या पर्यावरण संवर्धन जनजागृती अभियानाचे कौतुक
●जागतिक सायकल दिनाच्या औचित्यावर प्रणालीचे सावंतवाडी रोटरी क्लबतर्फे स्वागत
सावंतवाडी,ता.०७: “जागतिक सायकल दिन” साजरा होत असताना यवतमाळ जिल्ह्यातून “पर्यावरण संवर्धन” या विषयी जनजागृती करण्यासाठी कु.प्रणाली विठ्ठल चिकटे ही सायकलने गेली ७ महिने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.दरम्यान रोटरी क्लब, सावंतवाडीच्या सदस्यांनी आज सावंतवाडी शहरात तीचे रोटरीकडून स्वागत केले. यावेळी रोटरी अध्यक्ष डॉ. राजेश नवांगुळ यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि भेटवस्तु देवून सत्कार केला. पदवीधर झाल्यानंतर प्रणीताने सामाजिक जाणीवेतुन पर्यावरण संवर्धन साठी सायकल यात्रा करुन सुरु केली. आज वर त्यानी ८००० किलोमीटरचा प्रवास तिने पुर्ण केला. ध्येयाने प्रेरीत असलेल्या प्रणीताने कोरोनाच्या काळात ही आपला प्रवास चालु ठेवला याबद्दल सर्व थरातुन तिचे कौतुक करण्यात येत आहे.
“जागतिक-पर्यावरण-दिनाच्या” पुर्व संध्येला रोटरी क्लब, सावंतवाडी कु.प्रणाली चिकटे, सिंधुदुर्गचे वन-अधिकारी मा.शहाजीराव नरनवर आणि रोटरी अध्यक्ष-रो.डॉ.राजेश नवांगुळ सचिव दिलीप म्हापसेकर यांच्या हस्ते रोटरी क्लब, सावंतवाडी आणि सावंतवाडी नगरपालिका यांच्या सयुक्त विद्यमाने जनरल जगनाराव भोंसले उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. या दोन्हीही कार्यक्रमाना रोटरी अध्यक्ष.डॉ.राजेश-नवांगुळ सचिव दिलीप-म्हापसेकर,करंदीकर,साईप्रसाद-हवालदार,सुधीर नाईक, प्रमोद भागवत,डॉ. स्नेहल गोवेकर,अभिजित वझे, नगरपालिका अधिकारी आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment